'२१' सर्वकालीन श्रेष्ठ अल्बम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 13:31 IST
'२१' सर्वकालीन श्रेष्ठ अल्बम ऑस्कर विजेती गायक एडेलचा २0११ मध्ये आलेल्या '२१' या अल्बमला सर्वकालीन श्रेष्ठ अल्बम म्हणून बिलिबोर्ड नियतकालिकाने मान्यता दिली आहे.
'२१' सर्वकालीन श्रेष्ठ अल्बम
ऑस्कर विजेती गायक एडेलचा २0११ मध्ये आलेल्या '२१' या अल्बमला सर्वकालीन श्रेष्ठ अल्बम म्हणून बिलिबोर्ड नियतकालिकाने मान्यता दिली आहे. जाहीर केलेल्या २00 अल्बमच्या यादीत '२१' ने सर्वांत वरचे स्थान प्राप्त केले आहे. या अल्बमने २४ आठवडे लोकप्रियतेच्या शिखरावर राहण्याचा विक्रम केला आहे. एखाद्या गायिकेच्या दृष्टीने हा मोठाच विक्रम आहे. या यादीमध्ये 'साऊंड ऑफ म्युझिक' हे साऊंड ट्रॅक दुसर्या स्थानावर आहे तर मायकल ज्ॉक्सनचे 'थ्रीलर' तिसर्या क्रमांकावर आहे. २७ वर्षीय एडेलचे 'रोलिंग इन द डीप' आणि' सेट फायर टू द रेन ' हे विशेष लोकप्रिय ठरले आहेत. तिला सहा ग्रॅमी अवॉर्ड मिळाले आहेत.