शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

वेध - डॉक्टर देवच!

By admin | Updated: March 28, 2017 00:18 IST

डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्यांच्यावेळी समाज म्हणून आपण मूकदर्शक राहू शकत नाही.त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे

न्यायासनावर बसलेल्या माणसांनी व्यक्त केलेल्या मतांना लोकशाहीत ‘न्यायदान’ असे म्हणतात. त्यामुळे या रामशास्त्र्यांनी, ‘‘भीती वाटत असेल तर डॉक्टरी व्यवसाय सोडा’’ असे म्हणणे डॉक्टरांना खचवणारे व गुंडांना बळ देणारे ठरते.

डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्यांच्यावेळी समाज म्हणून आपण मूकदर्शक राहू शकत नाही.त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहायलाच हवे. पण, त्याचवेळी अलीकडच्या काळात डॉक्टरांवर असे हल्ले वारंवार का होतात, या प्रश्नाचा शोध डॉक्टरांनी अंतर्मुख होऊन घेणे तेवढेच गरजेचेही आहे. डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्या अपप्रवृत्तींना वचक बसेल, अशा तरतुदी सरकारने कायद्यात तातडीने करायला हव्यात. डॉक्टरांच्या संपाबाबत न्यायालयाने व्यक्त केलेले मत वैद्यकीय क्षेत्रातील प्रामाणिक व्यक्तींवर अन्याय करणारे आहे, ही गोष्टही सुजाण म्हणवून घेणाऱ्या जागरूक नागरिकांनी न्यायसंस्थेला स्पष्टपणे सांगण्याचीही हीच वेळ आहे. न्यायासनावर बसलेली माणसे विवेकशील असतात. त्यांनी व्यक्त केलेल्या मतांना लोकशाहीत ‘न्यायदान’ असे म्हणतात. त्यामुळे या रामशास्त्र्यांनी, ‘‘भीती वाटत असेल तर डॉक्टरी व्यवसाय सोडा’’ असे म्हणणे डॉक्टरांना खचवणारे व गुंडांना बळ देणारे ठरते. म्हणूनच ते अनाठायी आणि न्यायदानातही न बसणारे आहे. उद्या खरोखरच या देशातील सर्वच डॉक्टरांनी काही दिवसांसाठी ही सेवा बंद केली तर त्याची जबाबदारी आपण स्वीकारणार का, असा प्रश्न या रामशास्त्र्यांना कुणीतरी विचारायला हवा.डॉक्टरांवर वाढत असलेल्या हल्ल्यांना वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तीही कारणीभूत आहे. काही लुटारू डॉक्टरांनी या पवित्र क्षेत्राला बदनाम केले आहे. या डॉक्टरांच्या पिळवणुकीच्या कहाण्या आपण नेहमी ऐकत आणि वाचत असतो. कसायाबद्दलही सहानुभूती वाटावी एवढे ते अमानुष वागतात, हा अनेकांचा अनुभवही आहे. पण या बदमाशांची शिक्षा या क्षेत्रात बहुसंख्येने असलेल्या प्रामाणिक डॉक्टरांना देणे योग्य नाही. विशेषत: शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या बाबतीत अशा घटना जास्त घडतात. डॉक्टर-कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त, सोयी-सुविधा नाही, अशा विपरीत परिस्थितीत प्रचंड तणावात डॉक्टरांना तिथे काम करावे लागते. रुग्णालयात आलेल्या प्रत्येक रुग्णाला डॉक्टरांनी प्रथम आपल्यालाच तपासले पाहिजे, असे वाटते आणि इथेच या भांडणाला सुरुवात होते. नातेवाईक रुग्णाला खासगी रुग्णालयात घेऊन जातात तेव्हा तो मरणासन्न अवस्थेत असतो. आपल्याकडे आलेला पेशंट मरावा, असे कुठल्याही डॉक्टरला वाटत नाही. तो रुग्णाला वाचविण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न करतो. त्यात त्याला यशही मिळते. ‘रुग्णाचे प्राण वाचले’ हेच त्याचे खरे समाधान असते. पण, त्याला वाचवू शकला नाही तर नातेवाइकांच्या रोषाला तो बळी पडतो. एरवी ‘‘माझा परिचित, कार्यकर्ता तुमच्याकडे अ‍ॅडमिट आहे. काळजी घ्या, कमी पैसे घ्या’’ असे डॉक्टरला अधिकाराने सांगणारे नेते, पत्रकार, मान्यवर हल्ल्याच्यावेळी मात्र गायब होतात, कुणीही मदतीला धावून येत नाही. डॉक्टरांवरील हल्ल्यांना वैद्यकीय क्षेत्रातील लुटारू, सरकार जसे कारणीभूत आहे. तशीच माध्यमेही दोषी आहेत. या घटनांचे बरेचदा एकांगी वृत्तांकन होते आणि त्यातूनच संबंधित डॉक्टर काहीच दोष नसताना समाजाच्या दृष्टीने खलनायक ठरतो. अलीकडच्या घटनांनी प्रामाणिक डॉक्टर अस्वस्थ आहेत. अत्यवस्थ रुग्णावर उपचार करताना, ‘जर तो वाचला नाही तर आपल्या जिवाचे बरे-वाईट तर होणार नाही ना? या भीतीने त्यांना ग्रासले आहे. समाज म्हणून आपले ते अपयश आहे. परमेश्वराचे रूप म्हणावे असे सेवाभावी डॉक्टर समाजात अजूनही आहेत. पण, गल्लाभरू डॉक्टरांच्या गर्दीत या प्रामाणिक डॉक्टरांचा सेवाभाव समाजासमोर कधीच येत नाही. तो प्रकर्षाने समोर आला पाहिजे. त्यामुळे अशा घटनांना पायबंद बसेल. अत्याधुनिक वैद्यकीय उपचारपद्धती विकसित झाली नसतानाच्या काळात एखादा रुग्ण दगावल्यानंतरही रुग्णाचे नातेवाईक डॉक्टरला दोष देत नव्हते. ‘‘प्राण वाचविण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले’’ ही कृतज्ञता त्यांच्यात राहायची. अलीकडच्या काळात डॉक्टर आणि रुग्णांचे नाते दुरावले आहे. वर्तमानातील घटना त्या श्रद्धेला तडा देणाऱ्या आहेत. ही श्रद्धास्थाने उद्ध्वस्त होणे कुणाच्याही हिताचे नाही. संप ही क्षणभंगूर प्रतिक्रिया आहे. ते अंतिम साध्य नाही, याचेही भान डॉक्टरांनी ठेवायला हवे. ‘डॉक्टर हा देव आहे, दानव नाही’ या मूल्याच्या तळाशीच अनेक प्रश्नांची उत्तरे डॉक्टरांना आणि समाजालाही सापडणारी आहेत.- गजानन जानभोर