शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

वृक्ष गायब; अभियानाचा वाजला बिगुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 16:23 IST

मिलिंद कुलकर्णी शतकोटी वृक्ष लागवड योजनेचा बिगुल पुन्हा वाजला आहे. नवे उद्दिष्ट देण्यात आले आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयाने किती ...

मिलिंद कुलकर्णीशतकोटी वृक्ष लागवड योजनेचा बिगुल पुन्हा वाजला आहे. नवे उद्दिष्ट देण्यात आले आहे. प्रत्येक शासकीय कार्यालयाने किती झाडे लावायची, हे निश्चित करण्यात आले आहे. शासकीय बैठकीला उपचार आटोपला. वर्तमानपत्रात बातम्या प्रसिध्द झाल्या. विषय संपला.परंतु चार वर्षापासून ही मोहिम राबविण्यात येत असताना त्याचा त्रयस्थ संस्थेमार्फत ताळेबंद मांडण्यात आला काय? चार वर्षात किती झाडे लावली, किती जगली, त्यासाठी किती खर्च झाला. पर्यावरणात काही सकारात्मक बदल झाला काय, याचा हिशोब ठेवला काय? असे घडले असेल तर जगजाहीर करायला हवे. जनतेकडून त्याची खातरजमा करायला हवी. तर खऱ्या अर्थाने हे काम विश्वसनीयरीत्या आणि पारदर्शकपद्धतीने होत असल्याची जनसामान्यांची खात्री पटेल. अन्यथा हिवताप प्रतिबंधक अभियान, शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण या सारख्या शासकीय अभियानांसारखी स्थिती वृक्षारोपण मोहिमेची होईल.गेल्या वर्षी खड्डे आणि त्याचा हिशोब ठेवण्याचा प्रयत्न झाला. फोटो काढून पाठविण्याची सक्ती झाली. परंतु, त्याच त्या खड्डयांमध्ये दरवर्षी नव्याने रोपे लावली जात आहेत. ना कुठे गांभीर्य, ना कुठे तळमळ. केवळ उद्ष्टि पूर्ण करण्याची धावपळ असेच या मोहिमेचे वास्तव चित्र राहिले. अर्थात शासन आणि प्रशासन हे वास्तव स्विकारणार नाहीच. कागदावर रंगविलेले आकडे आणि कागदावर झालेल्या वृक्षारोपणाची आकडेवारी देऊन ‘शतकोटी अभियान’ १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा केला जाईल.जनतेला केवळ खोदलेले खड्डे दिसतात, पावसाळ्यात लावलेल्या रोपांच्या काड्या दिसतात, त्यांच्याभोवती केलेले वेगवेगळ्या प्रकारचे कुंपण दिसते, पण पुढे चित्र बदलते. पाण्याअभावी रोप जळते, कुंपणाच्या वस्तू गायब होतात. आणि खड्डा शाश्वत बनून राहतो, पुढच्या वृक्षारोपणाची वाट पाहत...नवीन वृक्षलागवड अभियानाची अशी दारुण परिस्थिती असताना अस्तित्वात असलेली वृक्षराजी सांभाळण्याचे, जपण्याचे कोणतेही ठोस प्रयत्न होताना दिसत नाही. विकासाच्या नावाखाली पहिली कुºहाड ही जुन्या, डेरेदार वृक्षांवर पडत आहे. खान्देशात रस्त्यांची कामे सध्या सुरु आहे. राज्य मार्ग आणि राष्टÑीय महामार्गाचे रुंदीकरण सुरु असल्याने त्यात आड येणाºया हजारो वृक्षांवर सर्रास कुºहाड चालविली गेली. रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर काही पटींनी झाडे लावण्याचे संबंधित विभाग आणि कंत्राटदारावर बंधन असते. परंतु, असे कोठेही झाल्याचे चित्र अद्याप दिसून आलेले नाही. नवापूर ते धुळे या महामार्गाचे काम बºयापैकी पूर्ण झालेले आहे. पण त्याच्या दोन्ही बाजूने वृक्षलागवड थातूरमातूर केली गेली आहे. धरणगाव ते अमळनेर रस्त्यावरील म्हसले गावाजवळ रस्त्याच्या दुतर्फा घनदाट असलेली वृक्षराजी रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली तोडण्यात आली. तब्बल ४ हजार झाडे तोडण्यात येणार आहे. कुठल्या जंगलात आल्यासारखी ही वृक्षराजी होती. आता ग्रामस्थांनी विरोध दर्शविल्यावर बांधकाम विभाग वृक्षतोडीचा पुनर्विचार करणार आहे.जळगाव ते औरंगाबाद, फागणे ते जळगाव या मार्गावरील झाडे तोडून मोठा कालावधी लोटला. रस्त्यांची कामे तर बंद पडली, पण झाडे गायब झाली. पर्यावरणावर झालेला परिणाम, पर्जन्यमान आणि तापमानाविषयी निर्माण झालेली अनिश्चितीता हे दृष्य परिणाम आम्ही लक्षात घेत नाही. कधी आम्हाला गांभीर्य येणार आहे , कळायला मार्ग नाही.

टॅग्स :Jalgaonजळगाव