शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

नोटाची चर्चा, बहिष्काराचे अस्त्र

By admin | Updated: February 22, 2017 00:15 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ‘नोटा’चा वापर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. परंतु यंत्रबद्ध झालेल्या

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ‘नोटा’चा वापर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. परंतु यंत्रबद्ध झालेल्या ‘नोटा’बद्दल चर्चेपलीकडे काही घडत नाही. परिणामी मतदानावर बहिष्कारासारखे अनधिकृत अस्त्र वापरले जाते. जिल्हा परिषद निवडणुकीत नांदेड, हिंगोली जिल्ह्यात २४ गावांनी बहिष्कार पुकारला. त्यातील १५ गावांचे मन वळविण्यात यश आले असले तरी ९ गावांनी मतदान केले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने मतपत्रिकेवर ‘नोटा’चा (वरीलपैकी कोणीही नाही) पर्याय उपलब्ध करून दिला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत देशात सर्वात पहिल्यांदा या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्राने केली. १ डिसेंबर २०१३नंतर झालेल्या निवडणुकांमध्ये मतदारांनी नोटाचे बटन दाबले. मतदानाचा हक्क बजावणाऱ्यास कोणालाही मतदान करायचे नसेल तर नोटाचे बटन दाबून आपले मतदानाचे मूल्य कोणाच्याही पदरी टाकायचे नाही हे सांगता येते. थेटपणे ती सर्व उमेदवारांना नापसंती असते. याची दखल घेत राजकीय पक्षांनी योग्य उमेदवारांची निवड करावी, असा उदात्त हेतू आहे. प्रत्यक्षात निवडणुकीत नोटा मतदानाची अन् नोटांची चर्चा तेवढी होते. त्यापेक्षा अधिक काही घडत नाही. म्हणूनच आपले प्रश्न सोडविण्यासाठी बहिष्काराचे अस्त्र वापरले जाते. त्याचीही चर्चा होते. उमेदवार मतदान व्हावे म्हणून आटापिटा करतात. प्रशासन धावते. शेवटी कुठे बहिष्कार मागे घेतला जातो, कुठे कायम राहतो.राज्यातील अनेक गावांत हे जसे घडले तसे एकट्या नांदेड जिल्ह्यात १९, तर हिंगोलीत ५ गावांनी मतदानच करायचे नाही, असा निर्धार केला. कोणाला रस्ता हवा आहे, कोणाला पाणी हवे आहे, अगदी मूलभूत प्रश्नांसाठी लोकशाहीतील सर्वोच्च मूल्य नाकारण्याचा निश्चय गावकऱ्यांनी केला. वर्षानुवर्षे रेंगाळलेल्या, तुंबलेल्या प्रश्नांची ना दाद ना फिर्याद. उमेदवारांची धावपळ, प्रशासनाचे प्रयत्न १५ गावांमध्ये कामी आले. तरीही ९ गावांतील लोक मतदानयंत्राकडे फिरकले नाहीत. उमरी तालुक्यातील बितनाळ, मोखंडी, बोथी, तुराटी व सावरगावमधील एकानेही मतदानप्रक्रियेत भाग घेतला नाही. महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या या गावांनी तर उमेदवारांना प्रचारालाही फिरकू दिले नाही. प्रवेशबंदीचे फलकच डकविले. पाचही गावांमध्ये मतदान केंद्र अधिकारी, कर्मचारी बसून होते. कोणी स्वेच्छेने मतदान करायला आले तर त्याला निर्भयपणे मतदान करता यावे म्हणून दांडगा पोलीस बंदोबस्तही होता. परंतु गावाचा संपर्क तोडणाऱ्या रस्त्याच्या प्रश्नासाठी ही सर्व गावे एकवटली होती. लोहा तालुक्यातील वागदरवाडीने दुपारी २ नंतर बहिष्कार मागे घेतला असला तरी वाडीची कथा चक्रावून टाकणारी आहे. कधीकाळी साक्षरता अभियानात महाराष्ट्रात अव्वल ठरलेल्या वागदरवाडीला पाण्यासाठी टाहो फोडावा लागतो. सैनिकांचे गाव अशी ओळख असलेल्या वागदरवाडीतील शंभरावर सैनिक सीमेवर आहेत.गावात बहुतांश वृद्ध व महिलाच राहतात. ज्यांना तीन किलोमीटरचा डोंगरी रस्ता पूर्ण करूनच घागरभर पाणी आणावे लागते. दिवशी गावातील शाळेला पाऊस आला की, सुटी द्यावे लागते. असेच काहीसे रस्ता, पाण्याचे मूलभूत प्रश्न घेऊन २४ गावांना नोटाचा पर्याय अवलंबण्यापेक्षा बहिष्कार सोयीचा वाटला. किमान प्रशासन आश्वासनांसाठी गावापर्यंत पोहोचले. प्रत्यक्ष पदरी काय पडेल, हे येणाऱ्या काळात दिसणार आहे. शेवटी नोटा असो की बहिष्कार या दोन्ही पर्यायापासून मतदार दूर राहील, मतदानाचा हक्क बजावेल. योग्य उमेदवाराची निवड होईल, असे वातावरण तयार करणे ही शासन, प्रशासन अन् सर्वच राजकीय पक्षांची जबाबदारी आहे. उमरी तालुक्यातील पाच गावांनी तर आम्हाला तेलंगणाच्या हवाली करा असे सांगणे म्हणजे मोठी नामुष्की आहे. सत्ता कोणीचीही असो, लोकप्रतिनिधींच्या पत्रांना दाद मिळणार नसेल, निधीचा ठेंगा दाखविला जात असेल तर मतदानाचे मूल्य बहिष्कारात वाहून जाईल.- धर्मराज हल्लाळे