शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

उन्हाळ्याची देणगी

By admin | Updated: May 1, 2016 03:15 IST

मेमहिना आत्ता कुठे सुरू झाला आहे. अजून अख्खा महिना या उकाड्यात काढायचा, कसं होणार? असे तक्रारीवजा सूर या दिवसांत घरोघरी ऐकायला मिळतात. त्याचबरोबरीने रंगतात

- भक्ती सोमण मेमहिना आत्ता कुठे सुरू झाला आहे. अजून अख्खा महिना या उकाड्यात काढायचा, कसं होणार? असे तक्रारीवजा सूर या दिवसांत घरोघरी ऐकायला मिळतात. त्याचबरोबरीने रंगतात ते गावाला जायचे बेत. कारण तिथे तर आजीच्या हातचे पदार्थ खायला मिळणार असतात. पण गावात किंवा शहरात काय हा उन्हाळा संपूर्ण वर्षासाठी पर्वणीचा महिना असतो. वर्षभराचे तिखट, मसाला करायचा आहे. काही हरकत नाही! दुपारच्या उन्हात लाल मिरच्यांना आणि खड्या मसाल्यांना काही दिवस उन्ह दाखवलं की पुरतं. मग थोडंसंच भाजून मिक्सरवरून काढलं की मसाला तयार असतो. उन्हात भाजल्यामुळे पदार्थांना आलेला खमंगपणा घरच्यांनाही तृप्त करतो. त्यामुळेच विविध मसाल्यांची रेलचेल या महिन्यात बघायला मिळते. या काळात तयार केले जाणारे पदार्थ म्हणजे पापड, कुरडया, सांडगे वगैरे. गावात हे पदार्थ करताना येणारी मजा खूपच भारी असते. माझ्या घोसाळा गावात या दिवसांत पापडांसाठी होणारी लगबग अनुभवली आहे. दुपारी जेवणं झाली की माझी अलका आजी मामीबरोबर पापडाची तयारी करते. त्यासाठी उखळीवर पोह्याचे पीठ, तिखट मीठ वगैरे घालून ते कुटले जायचे(आजही जाते). एकदा तिची या गोळ्याबद्दल खातरी झाली की मग गावातल्याच बायका पापड लाटायला बसायच्या. हे करताना मध्येच तो गोळा खाण्यासाठी आम्हा मुलांची मस्ती चालू असायची. आमच्या मागण्यांना कंटाळून मग आजी उखळीवर पुन्हा डांगर करण्याठी झटायची. पोह्याचे ते डांगर तेलाबरोबर खाणे म्हणजे... त्यासाठी शब्दच अपुरे. तर तांदूळ तीन दिवस पाण्यात ठेवून ते आंबवून घ्यायचे मग दळून घ्यायचे. फणसाच्या पानावर फेण्या सारवून त्या वाफेवर उकडवायच्या. त्या मऊसूत तांदळाच्या फेण्या आणि पिकलेल्या आब्यांचा वर्षभर टिकणारा साखरांबा करावा तोही कमला आजीनेच. तर मालती आजी आंब्याचा रस काढून तो शिजवून वर्षभरासाठी करायची. या आणि अशा अनेक आठवणी प्रत्येकाच्या असतील. विविध साठवणीचे पदार्थ या कालावधीत होतात. ते करताना गृहिणीला मिळणारे समाधान हे घरातल्यांना वर्षभर सुख देणारे असते. म्हणूनच मे महिन्याच्या घामाच्या या धारा श्रमसाफल्य झाल्याचा आनंद देतात ते उगाच नाही!वाळवलेल्या पदार्थांचा उपयोगया कालावधीत भाज्या वाळवून वर्षभर त्यांचा वापर करता येऊ शकतो. काही पंजाबी भाज्यांमध्ये कसुरी मेथी घालतात. ही कसुरी मेथी म्हणजेच उन्हाळ्यात वाळवलेली मेथी. ही मेथी बटाटा घालूनही छान लागते. मेथीप्रमाणे पालक, लाल माठ यांच्याबाबतीतही असे प्रयोग होऊ शकतात. तर मुगाचे भजीला लागते त्याप्रमाणे थोडे जाडसर पीठ घेऊन त्याचे छोटे गोळे उन्हात वाळवायचे. ते वर्षभर टिकतात. या मुगवड्या दुधीची भाजी करताना घालता येतात. शिवाय आलं, लसूण, कांदा, टॉमेटो यांचे वाटण करून त्या ग्रॅव्हीत थोड्या तेलात परतून मग उकडलेल्या मुगवड्या घालून केलेली भाजी केवळ अप्रतिम लागते.