शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

उत्कृष्ट करिअरसाठी कौशल्याधारित अभ्यासक्रम

By admin | Updated: May 29, 2016 03:24 IST

भविष्यामधील करिअरच्या उत्कृष्ट संधी प्राप्त करण्यासाठी दहावी, बारावी आणि पदवी स्तरावर कौशल्याधारीत अभ्यासक्रमांची निवड करणे आवश्यक आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या

- प्रा. दीपक ताटपुजे (करिअर मार्गदर्शक आणि समुपदेशक)भविष्यामधील करिअरच्या उत्कृष्ट संधी प्राप्त करण्यासाठी दहावी, बारावी आणि पदवी स्तरावर कौशल्याधारीत अभ्यासक्रमांची निवड करणे आवश्यक आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या सर्व क्षेत्रांतील वापरामुळे अद्यायावत कौशल्य वृद्धी करणारे अभ्यासक्रम निवडणे आवश्यक आहे. दहावीनंतर अनेक क्षेत्रात कौशल्यवृद्धींगत करणारे अनेक अभ्यासक्रम आज उपलब्ध आहेत. दहावीनंतर व्यावसायिक (व्होकेशनल), विविध तंत्रज्ञानाचे तीन वषार्चे डिप्लोमा अभ्यासक्रम, किमान कौशल्यावर आधारीत (एम.सी.व्ही.सी) अनेक अभ्यासक्रम, आय.टी.आय.चे अभ्यासक्रम, कृषी क्षेत्रातील अनेक पदविका त्याचबरोबर प्रमाणपत्र अभ्यासक्रम असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. दहावीनंतर आपल्या करिअर विषयक कल व आवडीनुसार अभ्यासक्रमाची निवड करावी. हे अभ्यासक्रम अद्ययावत कौशल्ययुक्त असणे करिअर समृद्धीसाठी आवश्यक आहे. मुलभूत अभ्यासक्रमाला बदलत्या काळानुसार कौशल्यांची जोड देताना ‘करिअर मॅपिंग’ ही संकल्पना माहीत असणे गरजेचे आहे. दहावीनंतर आय.टी.आय.चा विशिष्ट अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांनी सी.एन.सी. आॅपरेशन्स, सी.एन.सी. प्रोग्रामर आदी अद्ययावत कौशल्यांची जोड देणे महत्वाचे आहे. संगणक क्षेत्राची निवड करणाऱ्या युवकांनी येत्या काळात नव्या तंत्रज्ञानाचा वेध घेऊन आपल्या मुलभूत संगणकीय ज्ञानाला कौशल्यांची जोड देणे गरजेचे आहे. ‘इंटरनेट आॅफ थिंग्ज’, ‘थ्रीडी प्रिंटींग’, ‘पर्सनल क्लाउड कॉम्प्युटिंग’, ‘अँड्रॉइड-विंडोज डेव्हलपमेंट’ आदी अद्ययावत कौशल्यांच्या अभ्यासक्रमांची निवड करणे गरजेचे आहे.दहावीनंतर विज्ञान शाखेतील बारावीचा पर्याय निवडताना ‘पी.सी.एम.’, ‘पी.सी.बी.’, किंवा ‘पी.सी.एम.बी.’ या विषयांचा ग्रुप जाणीवपूर्वक घेताना पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेश पात्रता परिक्षांची माहिती घेणे अत्यावश्यक बनले आहे. मुलभूत विज्ञानशाखा, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, वैद्यकिय आणि उपवैद्यकिय या शाखांचे अभ्यासक्रम उपलब्ध असतानाच त्यापैकी पर्यायांची निवड ही स्वगुणवत्तेच्या आधारे करताना प्रवेशाच्या स्पर्धेचाही विचार करणे महत्वाचे आहे. आजचे युग अनेक क्षेत्रांमध्ये ‘स्पेशलायझेशन’चे असल्याने निवड केलेल्या शाखांमधील उपशाखांच्या विस्ताराची माहिती योग्य वेळीच घ्यायला हवी. - पत्रकारिता, भाषा विकास तज्ज्ञ, भाषा विज्ञान, विज्ञान भाषा संवाद, दृकश्राव्य भाषा विज्ञान, विकास संवाद, व्हिज्युअल लँग्वेंज फॉर डिजिटल मीडिया आदी अनेक उपशाखांमधील अभ्यासक्रमांची उपलब्धता असल्याने अद्ययावत कौशल्यांचे महत्त्व करिअर संधींसाठी मोठ्या प्रमाणात वाढते आहे.नवीन शाखांचा उदयभाषा शास्त्रासारख्या कला शाखेतील अभ्यासक्रमासही तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने अनेक नवीन शाखांचा उदय झाला आहे.वैद्यकीय शाखेला पर्यायउपवैद्यकीय शाखेचा विस्तारही मोठ्या प्रमाणात झाला आहे. फार्मसी, दंतवैद्यक, नर्सिंग, वैद्यकीय प्रयोगशाळाशास्त्र, फिजीओ थेरेपी, मेडिकल इमेजिंग टेक्नॉलॉजी, डायलेसीस तंत्रज्ञान, रेडिओलॉजी यांसह अनेक उपशाखांमधील स्पेशलायझेशनचे अभ्यासक्रम आज उपलब्ध असल्यानेच करिअर मॅपिंगला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे.