शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
2
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
3
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
4
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
5
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
6
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
7
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
8
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
9
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
10
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
11
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
12
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
13
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
14
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
15
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
16
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
17
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
18
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
19
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
20
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  

सव्यसाची, अवलिया पत्रकाराची अकाली एक्झिट

By admin | Updated: February 3, 2017 06:56 IST

पांढरा शुभ्र शर्ट, तेवढीच स्वच्छ पांढरी पॅन्ट, काखेत लेदरचा पाऊच, त्यात पान, सुपारी, चुना, कात असा सारा जामानिमा ! जणू तो बातमी रंगवण्याआधीच. स्वत:च्या मनासारखा विडा रंगला

- दिनकर रायकर(समूह संपादक, लोकमत)पांढरा शुभ्र शर्ट, तेवढीच स्वच्छ पांढरी पॅन्ट, काखेत लेदरचा पाऊच, त्यात पान, सुपारी, चुना, कात असा सारा जामानिमा ! जणू तो बातमी रंगवण्याआधीच. स्वत:च्या मनासारखा विडा रंगला की त्यांच्या लेखणीला बहार येत असे. त्यांचा हा रोजचा नित्यक्रम. मी इंडियन एक्स्प्रेसमध्ये आणि ते लोकसत्तामध्ये. हेमंत कुलकर्णी नावाच्या अजब रसायनाची माझी पहिली भेट तिथेच झाली. त्याला आज ४०वर्षे झाली. त्यांनी लिहिलेली कॉपी अशी काही चपखल असायची, की त्यात मोठ्या मुश्किलीने चूक निघायची. काना, उकार, मात्रेसह शुद्ध, कसलीही भेसळ नसणारी कॉपी हे त्यांचे बलस्थान! विद्याधर गोखलेंच्या काळात त्यांनी रविवार पुरवणीचे काम पाहिले. पण ते काही वर्षेच मुंबईत रमले. नंतर लोकसत्ताची नोकरी सोडून डेअरी काढायची, म्हणून नाशिकला गेले ते कायमचे. पण पत्रकारिता त्यांना शांत बसू देत नसावी. तेथून त्यांनी अर्धवेळ पत्रकार म्हणून काम सुरूकेले. नाशिक सोडायचे नाही, हा हट्ट कायम होता. पण माधव गडकरींच्या आग्रहाखातर त्यांनी नाशकातूनच लोकसत्तासाठी पूर्णवेळ काम करण्यास सुरुवात केली.गडकरींच्या नंतर अरुण टिकेकरांच्या काळातही ते तेथे होते. टिकेकर लोकमतमध्ये मुख्य संपादक म्हणून आले, तसे हेमंतरावही त्यांच्या आग्रहाखातर लोकमतमध्ये आले. साधारण २००३ची ही गोष्ट. त्याआधी एकच वर्ष मी औरंगाबाद लोकमतला संपादक म्हणून काम सुरू केले होते. औरंगाबादला २००४ साली रा.ग. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. त्यावर कठोर भाष्य करणारा अग्रलेख हेमंतरावांनी लिहिला. लोकमतमध्ये त्यांनी लिहिलेला तो पहिला अग्रलेख. विजया राजाध्यक्ष यांना २९ जानेवारी २०१७ रोजी जाहीर झालेल्या ‘जनस्थान’ पुरस्काराच्या निमित्ताने त्यांनी लोकमतमध्येच लिहिलेले भाष्य हे त्यांचे शेवटचे लिखाण. एखाद्या संपादकाने त्याच्या कारकिर्दीत काम करताना एकाच दैनिकातील कामाची सुरुवात आणि शेवट अशा प्र्रकारे साहित्यिक लेखनाने करण्याचा हा अपूर्व योगायोग आता कायमच्या हेमंतरावच्या नावावर जमा झाला.मराठी आणि इंग्रजी भाषेवर कमालीचे प्रभुत्व असणारे हेमंतराव हाडाचे पत्रकार होते. आपल्याच आनंदात जगणे, आपल्याच टेचात जे वाटते, जे पटते ते परखडपणे लिहिणे हा त्यांचा स्थायीभाव. त्यासाठी त्यांनी कधीही, कोणतीही तडजोड केली नाही किंवा कसल्या आमिषालाही ते कधी बळी पडले नाहीत. हेमंतरावांना गृहीत धरणारी व्यक्ती मला कधीही कोणत्याही क्षेत्रात आजपर्यंत सापडलेली नाही. यावरून त्यांचा स्वभाव लक्षात यावा.ज्येष्ठ पत्रकार गोविंद तळवळकरांशी त्यांचा पत्रव्यवहार व स्नेह कायम होता. तर कविश्रेष्ठ वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांना अवघा महाराष्ट्र प्रेमाने तात्या म्हणायचा. पण त्यांना ‘तात्याराव’ असे म्हणणारी, लिहिणारी एकमेव व्यक्ती म्हणजे हेमंतराव. तात्यांच्या नावाने नंतर नाशकात कुसुमाग्रज प्रतिष्ठान स्थापन झाले. त्यात कोणी थोडेही इकडे तिकडे काही केले की हेमंतरावांनी तलवार उपसलीच समजा. इतका त्यांचा तात्यांवर स्नेह होता. विजया राजाध्यक्षांना जनस्थान पुरस्कार जाहीर होईपर्यंत तो कायम राहिला.आधी आवडीने पान खाणारे हेमंतराव नंतर सुपारी तंबाखू खाऊ लागले. स्वत:चा धार लावलेला आडकित्ता, त्यात सुपारी पकडून ती अगदी बारीक कापून डबीत भरून ठेवायची, तंबाखूची वेगळी डबी, हे सारे अत्यंत नेटकेपणाने एका लेदरच्या पाऊचमध्ये त्यांच्या सोबत कायम असायचे. अनेकदा त्यावरून त्यांना टोकले तरी, जाऊद्या राव... असे म्हणत ते पुन्हा तेवढ्याच आत्मीयतेने सुपारीला आडकित्यात धरायचे.लोकमतमध्ये आल्यानंतर आम्हा दोघांचा खूप जवळचा संबंध आला. सटायर लिखाण हा त्यांच्या अत्यंत आवडीचा प्रकार होता. अनेक विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण पण तिरकस शैलीत त्यांनी केलेले लिखाण ज्याच्यावर असायचे त्याला ते बोचायचे आणि आतून गुदगुल्याही करायचे. अनेकदा ते खूप झोंबायचे. असे नेते मला फोन करून हेमंतरावांना आवरा, असे विनवायचे. मी त्यावरून काही विचारले की मलाच ते तिकडून मिश्कील हसत विचारायचे... ‘आला होता ना त्याचा फोन? आणखी थोडं ठोकू का उद्या.’ मग पुन्हा मिश्कीलपणे हास्य.अत्यंत अजब असे हे व्यक्तिमत्त्व होते. त्यांना एखाद्या विषयावर लिखाण मागितले आणि ते त्यांनी तासाभराच्या आत अत्यंत अचूकपणे दिले नाही, असे कधीही झाले नाही. हा त्यांचा गुण हेरून गेल्यावर्षी त्यांना ग्रुप असोसिएट एडिटर केले गेले. संपादकीय पानाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. रोज सायंकाळी सहाच्या दरम्यान संपादकीय पान माझ्याकडे यायचे. त्याच पानावर त्यांच्यावर लिहिण्याची वेळ माझ्यावर येईल, असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. आताही वाटते की त्यांचा फोन येईल आणि संपादकीय पान टाकले आहे, असा निरोप देतील..!