शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
3
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
4
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
5
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
6
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
7
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
9
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
10
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
11
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
12
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
13
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
14
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
16
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
17
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
18
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
19
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
20
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी

बरोबर बोलले राज ठाकरे !

By admin | Updated: April 9, 2015 22:45 IST

राज ठाकरे जे बोलले, ते त्यांच्या दृष्टीने विचार करायचा तर बरोबरच बोलले म्हणायचे. कुंभमेळ्याचा नाशिक महापालिकेशी काय संबंध हा राज ठाकरे यांचा

 किरण अग्रवाल - राज ठाकरे जे बोलले, ते त्यांच्या दृष्टीने विचार करायचा तर बरोबरच बोलले म्हणायचे. कुंभमेळ्याचा नाशिक महापालिकेशी काय संबंध हा राज ठाकरे यांचा प्रश्न चुकीचा कसा म्हणता यावा? कारण त्यांचा मुळात नाशिकशी व नाशिक महापालिकेशीच संबंध उरला नसल्याची स्थिती असल्याने कुंभमेळ्याच्या संबंधाशीही त्यांना काय देणे-घेणे असावे?कुंभमेळा हा काही एकट्या नाशिक शहराचा विषय नाही आणि त्यासंबंधीची जबाबदारीही महापालिकेची नाही, असे सांगत कर्ज काढून किती गोष्टी करायच्या, असा सवाल राज ठाकरे यांनी गेल्या नाशिकभेटीत केल्याने भाजपाचे सर्वच स्थानिक आमदार त्यांच्यावर बरसले. पण ठाकरेंच्या म्हणण्यात तथ्य आहे असेच म्हणायला हवे. कारण मुळात नाशिकच्या नवनिर्माणाचा वादा करीत महापालिकेच्या सत्तेत आलेल्या राज ठाकरेंच्या ‘मनसे’ला येथे अपेक्षेप्रमाणे काही करून दाखवता आलेले नाही. आपण स्वत: लक्ष घालून नाशकातील स्थिती बदलू आणि विकास घडवू असे त्यांनी वेळोवेळी सांगितले असले तरी, यासंबंधी आलेल्या अपयशातून हल्ली त्यांचा नाशिक व नाशिकच्या महापालिकेशीच संबंध उरला नसल्याचे चित्र आहे. कधीतरी हवापालटाला आल्यासारखे यायचे आणि गोदा पार्कवर फेरफटका मारून निघून जायचे याव्यतिरिक्त त्यांचा हा संबंध कधी वास्तवात उतरला नाही किंवा उतरला तर दृढ झाला नाही. त्यामुळे नाशिकला होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या जबाबदारीबद्दल महापालिकेतील सत्तेच्या अनुषंगाने त्यांना संबंध वाटेनासा झाला असेल तर, काय चुकले त्यांचे?खरे तर, सिंहस्थानिमित्त करावयाची जी काही विकासकामे आहेत ती केवळ साधू-महंतांसाठी किंवा गंगास्नानासाठी येणाऱ्या भाविकांसाठीच करावयाची नसून, या सर्वांच्या येण्याने नाशिककरांवर येणारा ताण हलका व्हावा म्हणून करावयाची आहेत, हे मूळ सूत्रच राज ठाकरे यांनी लक्षात घेतलेले नसावे. सिंहस्थ स्नानाच्या निमित्ताने येणाऱ्या कोट्यवधी भाविकांमुळे नाशिकच्या वाहतुकीवर, सार्वजनिक स्वच्छतेसह आरोग्यावर व इतरही यंत्रणांवर परिणाम होऊन त्यांची जी दमछाक होणार आहे ती होऊ नये म्हणून विविध कामे करावयाची आहेत. त्याची प्राय: जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिकेचीच असल्याने तेथील सत्ताधारी म्हणून राज ठाकरे यांना ती झटकता येऊ नये; परंतु कोणतेही काम करता येत नसेल तर त्याचे अपयश झाकण्यासाठी त्याची जबाबदारी झटकून मोकळे होण्याचा प्रयत्न राजकारण्यांकडून केला जात असतो. म्हणूनच राज ठाकरे यांनीदेखील तेच केले असेल तर त्यात आश्चर्य वाटून घेता येऊ नये. राहता राहिला प्रश्न विकासकामांसाठीच्या निधीचा, तर राज्य व केंद्र शासनाने सुमारे तीनेकशे कोटींचा निधी दिला आहेच, अजूनही कोट्यवधी येणे बाकी आहे. या निधीतून कामे साकारून आपले अपयश झाकण्याऐवजी जबाबदारी झटकणे राज ठाकरे यांना श्रेयस्कर वाटावे हेच पुरेसे बोलके आहे. चतुरस्र नेत्याची एक्झिटकॉँग्रेस ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना व्हाया शिवसेना, असा भाजपावगळता सर्वपक्षीय प्रवास करून झालेल्या अ‍ॅड. उत्तमराव ढिकले यांच्या अकस्मात ‘एक्झिट’ने जिल्ह्यातले अभ्यासू नेतृत्व निमाले आहे. वकील असल्याने पुराव्याशिवाय कधीही न बोलणाऱ्या उत्तमरावांनी प्रकृतीवरील उपचारासाठी संधीही न दिल्याने त्यांचे जाणे चटका लावून गेले आहे. सरपंच, मार्केट कमिटी व जिल्हा बॅँकेसह नाशिक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, नगराध्यक्ष, महापौर, आमदार, खासदार अशा अनेकविध जबाबदाऱ्या निभावलेल्या ढिकलेंची खासियत म्हणजे त्यांना असलेली लोकमानसाची जाण. लोकांची नाडी ओळखून त्यांनी निर्णय घेतले, पक्ष बदलले व यश मिळवले. अधिकतर राजकारण्यांना कुठे थांबायचे हे कळत नाही, पण ढिकलेंचे निदान त्याही बाबतीत अचूक ठरले. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी ते स्वत:हून थांबले. लोकांच्या प्रश्नांसाठी तळमळीने धडपडणारा व अभ्यासू नेता अशी ओळख त्यांनी अखेरपर्यंत जपली.