शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिल्या १४ सुविधांची यादी
2
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z समाज आक्रमक, सरकारविरोधात जोरदार निदर्शने
3
बिहारमध्ये झाला मोठा कांड! गावातील हिंदू घराघरातून निघाले मुस्लीम मतदार; गावकरीही झाले हैराण
4
निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी कुठे, कशी, कधीपासून गुंतवणूक करावी?
5
महिंद्राची थार १.३५ लाखांनी स्वस्त झाली; स्कॉर्पिओची किंमत १.४५, XUV 3XO १.५६ लाखांनी तुटली...
6
Maratha Reservation : सरकारच्या GR विरोधातच मंत्री छगन भुजबळ कोर्टात जाणार; मराठा आरक्षणावरून OBC नेते आक्रमक
7
उद्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक; संख्याबळ कोणाकडे? कोणाचा कोणाला पाठिंबा? जाणून घ्या...
8
अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात वाढ; निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांची मोठी घोषणा
9
World Record Broken! ४०० पारच्या लढाईत इंग्लंडनं साधला टीम इंडियाचा विश्व विक्रम मोडण्याचा डाव
10
अवघ्या १५० रुपयांत मिळतं लोकेशन, तर ६०० रुपयांत फोन रेकॉर्ड! पाकिस्तानी मंत्र्यांची सुरक्षा धोक्यात 
11
१५ वर्षीय मुलगी पाकिस्तानी मुलाच्या प्रेमात, भेटायला निघाली पण...; चॅटमधून खळबळजनक खुलासा
12
प्रयत्नांती परमेश्वर! लेक नापास पण आई झाली पास; वयाच्या पन्नाशीत लॉ कॉलेज प्रवेश परीक्षा क्रॅक
13
"कॅन्सर असल्याचं समजल्यानंतर ३ तास रडत होतो", संजय दत्तचा खुलासा, म्हणाला- "माझी पत्नी, मुलं सगळंच..."
14
विभाग प्रमुखांची नियुक्ती; शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीनाट्य, यादीत कुणाची नावे?
15
Pitru Paksha 2025: पितृपक्षात इतर प्राणी पक्षी सोडून कावळ्यालाच एवढं महत्त्व का? वाचा!
16
खुशखबर! मुंबई लोकल प्रवास आता गारेगार, वेगवानही; वंदे मेट्रोसारखे असतील डबे
17
नादखुळा...! उत्तराखंडमध्ये रस्ते बंद होते, चार विद्यार्थी बीएडची परीक्षा देण्यासाठी हेलिकॉप्टरने आले...
18
'भारतावर टॅरिफ लादणे योग्य निर्णय'; झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या कारवाईचे केले समर्थन
19
अमेरिकेच्या डोळ्यात खुपताहेत भारत-चीन; "जास्त टॅरिफ लावा," आणखी एका अधिकाऱ्यानं गरळ ओकली
20
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात पितरांच्या नैवेद्याआधी 'हे' पाच घास तुम्ही काढून ठेवता का?

गुणवत्तेची कास

By admin | Updated: February 16, 2015 00:43 IST

इतिहासाची पानं उलटता उलटता आज कधी उगवतो, हेही पुष्कळदा कळत नाही. गुणवत्तेचंही तसंच आहे. काय होतो आपण नि काय झालो आपण?

डॉ. कुमुद गोसावी - इतिहासाची पानं उलटता उलटता आज कधी उगवतो, हेही पुष्कळदा कळत नाही. गुणवत्तेचंही तसंच आहे.काय होतो आपण नि काय झालो आपण? मनातल्या मनात मग एक गणित सुरू होतं. त्याचं अचूक उत्तरही आपल्याकडंच असतं. उमेद, उत्साह नि ऊर्जा या तीन ओमकाराचं पैंजण आपापली गुणवत्ता आपल्याला बहाल करीत असतं, या पैंजणाच्या नादलयीत नवनवीन आव्हानांकडं जाता येतं हे अध्यात्मच आपल्याला सांगत असतं.मूर्ख माणूस स्वत:च्या दोषांकडं डोळेझाक करतो. इतरांचे दोष काढतो ‘मी’भोवतीची त्याची येरझार नि वाईट बुद्धीनं घडणारे व्यवहार यांनी तो घेरला जातो. मन:शांती, मन:स्वाथ्य घालवून बसतो. जात, धर्म, पंथ नि नाती-गोती यात अडकून पडतो कोळिष्टकासारखा. त्यामुळं गुणवत्तेची कुचंबणा होते. जोपर्यंत गुणवत्तेला महत्त्व येत नाही, तोवर समाजाला भविष्य नाही. जोडिली अक्षरे।नव्हती बुद्धीची उत्तरे।नाही केली आटी।काठी मानदंडासाठी।कोणी भाग्यवंत।तया कळेल उचित।तुका म्हणे झरा।आहे मुळीचाची खरा।जगद्गुरू तुकोबांंनी प्रापंचिकांना अशी गुणवत्तेची ओळख करून दिली आहे. तेव्हा त्यातील अध्यात्म ध्यानी घेऊन गुणवत्ता जपायलाच हवी, नाही का?संस्कृतीचा प्रकाश आत्मोन्नतीची दिशा दाखवतो. तिच्यामुळं आत्मबोधाची दालनं खुली होतात. म्हणून तर एखादा रिक्षावाला पिता नि लोकांची धुणी-भांडी करणारी माता आपल्या मुलांनी शिकून गुणवत्ता वाढवावी नि गुणवत्तेच्या आधारे डॉक्टर, इंजिनिअर होऊन सुखी जीवनाची गुढी उभारावी, यासाठी अहोरात्र कष्ट उपसतात, अर्धपोटी राहतात नि सुदैवानं त्यांचं स्वप्न सफल झालं तर आपल्या आयुष्याचं सोनं झालं असं मानतात.गुणवत्तेची महती जर आमचा कष्टकरी, कामकरी, शेतकरी स्वत:चा घाम गाळता-गाळता जाणू शकतो, तर समाजाच्या सर्वच स्तरांतील जनलोकांनी सर्वच क्षेत्रातील गुणवत्ता कशी राखली जाईल, तिची चिरंतन वृद्धीच कशी होईल, याकडं सर्वंकष लक्ष सतत पुरवलं, त्यासाठी गरजूंना मदतीचा समर्थ प्रेमळ हात पुढं केला, अभेदभाव राखला तर आजही गुणवत्तेचं प्रमाण वाढतच राहील. पै वसंताचे रिगवणे।झाडाचे नि साजेपणे।जाणिजे तेवी करती।सांगती ज्ञान।वसंताचा प्रवेश असा झाडांच्या टवटवीतपणावरून जाणता येतो, तसा कोणताही देश, कोणताही समाज त्याच्यातील गुणवत्तेवरून जाणता येतो. ‘विद्वान सर्वत्र पुज्यते’ तेव्हा आपला देश, आपली संस्कृती जर या गुणवत्तेवरून ओळखली जाते, तर तिची कास आपण प्रत्येकानं धरण्याचा संकल्प करायला काय हरकत आहे?