शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

निमित्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2017 01:50 IST

लेखकांची स्वाक्षरी, हस्ताक्षर वा त्यांच्याशी संवाद साधणारे वाचक रसिक या महाराष्ट्रात पाच पंचवीस तरी नक्कीच आहेत. त्यापैकी काही जणांचं प्रासंगिक लेखन

- रविप्रकाश कुलकर्णी

लेखकांची स्वाक्षरी, हस्ताक्षर वा त्यांच्याशी संवाद साधणारे वाचक रसिक या महाराष्ट्रात पाच पंचवीस तरी नक्कीच आहेत. त्यापैकी काही जणांचं प्रासंगिक लेखन वर्तमानपत्रातून वा त्यांच्या पुरवण्यातून प्रसिद्ध होत असतं. अशापैकीच रामदास खरे हे एक नाव. अर्थात ‘लोकमतच्या वाचकांना’ हे नाव अपरिचित नक्कीच नाही. कारण गेली दीड-दोन वर्षं लेखक आणि त्यांच्याशी झालेला पत्रसंवाद सांगणारं त्यांचं सदर ‘पत्रास कारण की’ वाचकांना चांगलंच आवडलेलं आहे.पण रामदास खरे हे भाग्यवान आहेत. त्यांचं सदर चालू असतानाच त्यांच्या या लेखनाचं पुस्तक ‘कॅलिडोस्कोप’ या नावाने व्यास क्रिएशनतर्फे प्रकाशित झालं आहे.अर्थात वृत्तपत्रातील सदर म्हटलं की, त्याला मर्यादित जागा असते. तसं खरं त्याच्याबाबतीतदेखील झालं असणार. पण हे लेखन ग्रंथबद्ध होत असताना मात्र रामदास खरे यांनी त्यात भर घातलेली आहे. त्यामुळे सदर पुस्तकात अनंत देशमुख यांची आस्वादक प्रस्तावना आहे. त्यात म्हटल्याप्रमाणे ‘खरे यांच्या ठिकाणी एका बाजूने त्या त्या लेखकाविषयीचा असलेला आदरभाव आणि दुसऱ्या बाजूला ज्या वाचकांसाठी आपण हा सारा लेखनाचा खटाटोप करत आहोत त्याला तो समजावा म्हणून आलेल्या साध्या सुलभ भाषेतील निवेदन दोन्ही दिसून येतात. म्हणूनच कॅलिडोस्कोपचं कोणतंही पान उघडावं आणि वाचायला सुरुवात करावी. क्षणार्धात वाचक त्यात गुंतून जातो ही खरी यांची कमाई आहे. मात्र यासंदर्भात काही गोष्टींकडे लक्ष वेधतो. रामदास खरे यांना पहिलं पत्र १९९४ मध्ये आलं. त्या अवस्थेचं ते वर्णन करतात, ...आणि मात्र स्वर्ग फक्त दोन बोटे उरला. गुलजार यांच्या आजकल पाव जमीं पर नही पडते मेरे... या गाण्यातल्या ओळीप्रमाणे त्यांची अवस्था झाली होती. पुढे लेखक, कवी यांना पत्र पाठविण्याचा सिलसिला आणि धडाका सुरू झाला. तो अगदी २००२ पर्यंत. रामदास खरे यांच्या सदरात ते ज्या लेखकाबद्दल लिहायचे त्याचं उत्तम चित्र सोबत असायचं. किंबहुना त्या चित्रामुळेदेखील लक्ष वेधलं जायचं. मुळात आपल्याकडे लेखकाचा फोटो असणं आणि तो छापणं फार दुर्मीळ गोष्ट आहे. त्यात तो सुंदर वगैरे असणं तर फारच दूरची गोष्ट आली. ही चित्रं लेखासोबत पुस्तकात आली असती तर किती बरं झालं असतं. त्याऐवजी लेखकाचे पोस्टाच्या तिकिटाएवढे फोटो लावले आहेत. कदाचित त्यामागे काही व्यावहारिक कारणही असू शकेल. पण यानिमित्ताने त्या चित्रकलेची नोंद आली असती तर बरं झालं असतं. यानिमित्ताने मी त्या चित्रकाराला जाहीर दाद देतो. रामदास खरे यांनी लिहिलेल्या पत्रांचा हा ठेवा मात्र कायमच स्मरणात राहील.