शहरं
Join us  
Trending Stories
1
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
3
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
4
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
5
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
6
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार
7
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
8
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
9
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
10
मोठी कारवाई! मराठवाड्यातील चार जिल्ह्यात ४ कोटी ४८ लाखांचा माल जप्त, ४६४ जणांना अटक
11
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
12
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
13
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
14
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
15
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
16
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
17
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
18
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
19
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
20
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा

मुंबई स्फोटाच्या तोंडावर उभी!

By admin | Updated: February 1, 2016 02:26 IST

मुंबईचे क्षेत्रफळ ४३७.७१ चौरस किलोमीटर. त्यातील १०३ चौ. किमी जागेवर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि उर्वरित क्षेत्रावर मुंबई वसली आहे.

मुंबईचे क्षेत्रफळ ४३७.७१ चौरस किलोमीटर. त्यातील १०३ चौ. किमी जागेवर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि उर्वरित क्षेत्रावर मुंबई वसली आहे. एक चौ.किमी म्हणजे १०० हेक्टर्स असे गृहीत धरले तर मुंबईचे क्षेत्रफळ आज ३३,४७१ हेक्टर्स होते. या संपूर्ण जागेवर पायाभूत सोयीसुविधा, लोकलचे जाळे वगळता उरलेल्या जागेवर १.५ कोटी एवढी लोकसंख्या आहे. त्यामुळेच सर्वाधिक लोकसंख्या असणारे मुंबई हे जगातले सहावे शहर बनले आहे. २०३० मध्ये मुंबईची लोकसंख्या २.८ कोटींच्या घरात जाईल, त्यावेळी सर्वात जास्त लोकसंख्या असणारे मुंबई हे जगातले चौथे शहर बनेल. या मुंबईत जमा होणाऱ्या कचऱ्यासाठी देवनार १३२, मुलुंड २५, गोराई १९.६, तर कांजूरमार्ग १४१ हेक्टर्स अशी चार डम्पिंग ग्राउंड्स आहेत. मुंबईकरांचा कचरा या ३१७ हेक्टर्स जागेवर जमा होतो. साहजिक चारही डम्पिंग ग्राउंडच्या परिसरातील लोक आज जीव मुठीत घेऊन जगत आहेत. देशाच्या या आर्थिक राजधानीला शांघाय करण्याची घोषणा कुठे गेली माहिती नाही; पण साधा कचऱ्याचा प्रश्नही पुरेसा मार्गी लागलेला नाही. सगळी डम्पिंग ग्राउंड्स उपनगरात आणि जॉगर्स पार्क, समुद्रकिनारे, खेळाची अद्ययावत सुसज्ज मैदाने चर्चगेट, सीएसटी ते शीवपर्यंत एकवटली आहेत. मुंबईचा कचरा आमच्याकडे का, असा सवाल उपनगरांमध्ये राहणारे करू लागले आहेत. यातून जनतेच्या संतापाचा उद्रेक होईल तेव्हा होईल, पण देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याने मात्र पेट घेतला. दोन दिवस मुंबईला कडकडीत उन्हात राख व धुराने वेढून टाकले. आगीचा फटका देवनार आणि परिसराला नाही तर अवघ्या मुंबईला बसला. थंडी असल्याने खूश असणाऱ्या मुंबईकरांनी धुके पसरले म्हणून आनंद साजरा केला. पण धुक्यासोबत येणाऱ्या राख आणि धूलिकणांची चादर कडकडीत उन्हातही कमी होईना तेव्हा कुठे घटनेचे गांभीर्य लोकांना कळाले. प्रशासनाने देवनार परिसरातील शाळा, कॉलेजना दोन दिवसांची सुटी जाहीर केली. घरादारांच्या खिडक्या बंद करून बसण्याची वेळ या भागातल्या लोकांवर आली. पण मोठमोठ्या मॉलमध्ये मात्र उदंड गर्दी तशीच. ‘नटसम्राट’ असो की ‘एअरलिफ्ट’ लोक सिनेमांना गर्दी करीतच होते. भेळ, वडापावच्या गाड्या असो की मासे विकणारे असोत, जो तो आपापल्या सोयीने कचऱ्यांचे ढीग वाट्टेल तेथे सोडून जाताना नेहमीच दिसतो. लोकही जाता येता रस्त्यावर, लोकलच्या डब्यात, सीटी बसमध्ये दिलखुलासपणे कचरा सोडून जात आहेत. पान खाऊन पिचकाऱ्या मारीत असतात.आज डम्पिंग ग्राउंडच्या कचऱ्याने पेट घेतला. महापालिकेचे अधिकारी ‘कचरा आहे, तो तर पेटणारच’ असे म्हणत हात वर करत आहेत. मात्र या प्रश्नाचे गांभीर्य मंत्रालयापासून पालिकेपर्यंत कोणालाही नाही. स्वातंत्र्य उपभोगण्याच्या नावाखाली सगळेच बेलगाम वागत सुटले आहेत. हे शहर कधीही झोपत नाही आणि कोणालाही उपाशी ठेवत नाही, यावरच्या अतिविश्वासापोटी प्रत्येकजण धावतोच आहे. कोणालाही मुंबईविषयी काही पडलेले नाही. हे शहर सुंदर राहिले पाहिजे, स्वच्छ राहिले पाहिजे, हे शहर टिकले तर आपण टिकू यावरही कोणाचा विश्वास उरलेला नाही. जो तो ओरबाडण्याच्या मागे लागला आहे.वाढत्या लोकसंख्येचे आणि शहरांचे नियोजन ज्यांनी करायचे त्या राजकीय नेत्यांकडे पाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुकांच्या पलीकडचा विचार नाही. मतांचे गठ्ठे जोपासणे याशिवाय दुसरा कार्यक्रम नाही. चरस, गांजा, अफू आणि गुंडगिरीच्या विळख्यातून स्वत:स मुक्त करून घेत सिंगापूरने कात टाकली आणि मग २०१५ मध्ये एक कोटी भारतीयांनी त्या शहराला भेट दिली. त्याचा आनंदोत्सव सिंगापूर पर्यटन विभाग साजरा करत आहे आणि दोन कोटी मुंबईकर मात्र ‘धुरांच्या रेषा हवेत काढी’ म्हणत बसले आहेत...- अतुल कुलकर्णी