शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
2
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
3
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
4
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
5
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
6
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
7
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
8
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
9
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
10
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
11
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
12
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
13
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
14
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
15
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
16
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?
17
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
18
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
19
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
20
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश

हरवलेली कौशल्ये

By admin | Updated: February 4, 2017 04:35 IST

काही संदर्भासाठी जुनी पुस्तके चाळत होते. कुसुमावती देशपांडे यांच्या दीपमाळ (१९५८) या निवडक कथासंग्रहात बहुतेक ‘नदी किनारी’ कथेत चटया, सुपे, टोपल्या

- डॉ. सौ. प्रज्ञा आपटेकाही संदर्भासाठी जुनी पुस्तके चाळत होते. कुसुमावती देशपांडे यांच्या दीपमाळ (१९५८) या निवडक कथासंग्रहात बहुतेक ‘नदी किनारी’ कथेत चटया, सुपे, टोपल्या आणि वेताच्या सुबक वस्तू बनविणाऱ्या बुरुडांच्या घरांचा उल्लेख आला. कथा वाचतानाच ‘वहाणा’ कथेत चपलांचा कारखाना निघाल्याने ज्याची स्वप्ने हरवतात अशा दादाजी चांभाराची व्यथा जाणवली. श्रीधर शनवारे यांच्या ‘बहुरूपी’ कवितेतील अनेक नकला वठवणाऱ्या लोककलावंतांची आठवण झाली. लोकसंस्कृतीमधील अनेक धूसर आठवणी जाग्या झाल्या. कालौघात हरवत जाणारे त्यांचे कौशल्य आठवले.याच काळात नात्यातील ज्या घरी वंशपरंपरेने गोंधळाची रीत आवर्जून पार पाडली जाते, त्यांच्याकडे जाण्याचा योग आला. नवरात्रात अंबा, दुर्गा यांच्या अवतारकथा ते कुशलतेने सादर करत होते. संबळ, तुणतुणे यांच्या तालावर लयबद्ध नृत्य करीत सप्तशृंगीदेवीची आराधना सुरू होती. अंगात लांब झगा, गळ्यात मण्यांच्या माळा, पगडीसारखी भरजरी टोपी घालून मध्यम वयाचे ते गोंधळी तल्लीन होऊन गात होते. वंशपरंपरेने चालत आलेला हा वारसा पिढ्यान्पिढ्या हस्तांतरित होतो असे समजले. ज्याची छबी तुकारामांवरच्या मालिकेतून पाहिली तो ‘दान पावलं’ म्हणून गात लोकांना सूर्योदयाची वर्दी देणारा वासुदेव काही वर्षांपूर्वी नाशिकला अवचित बघायला मिळाला. आज काळाच्या ओघात मागे पडलेल्या कला आणि व्यवसाय मनात तरळायला लागले. खूप वर्षांपूर्वी दिवाळीच्या तयारीला लागलेल्या गृहिणी अन्न कळकेल, खराब होईल या भीतीने कल्हई उडालेल्या पितळेच्या जड पातेल्या, ताटं, झाकण्या वेगळ्या काढून ठेवत. कल्हईवाला अगदी बिनतारी संदेश पाठवल्यासारखा त्या सुमारास येई. कोल्हाटी आणि माकडवालेही याच सुमारास येत. मुलांच्या घोळक्याच्या साक्षीने, मुलांची दिलखुलास दाद घेत त्यांचे भांड्यांना कल्हई करण्याचे काम चालायचे. तन् ... तन्... असा तारेचा मंजूळ आवाज आला की पिंजारी दादांच्या मागे मागे मुलांचा घोळका असे. आमच्या आजोळी कापसाच्या खोलीत त्यांचे कापूस पिंजण्याचे काम चालायचे. त्याचे कसब पाहण्यासारखे असायचे.झबल्यासारख्या कुडत्यावर रंगीबेरंगी कापडाचे तुकडे आणि आरसे यांचे सुरेख भरतकाम करणाऱ्या स्त्रिया फण्या, माळा विकताना क्वचित दिसत. इरावतीबाई कर्वेंनी त्यांचा लमाणी आणि वंजारी म्हणून उल्लेख ‘मराठी लोकांची संस्कृती’ या ग्रंथात केला आहे. कधी टोपलीभर बांगड्या घेऊन कासार यायचा. या साऱ्यांच्या आठवणी धूसर झाल्या कारण या परंपरा शहरात तरी खंडित झाल्या. परंपरेतून संस्कृतीचा लवचिक प्रवाह वाहत असतो. ‘पोटापुरते देई। मागणे लई नाही’ असे जगणारे आणि घरपोच सेवा आणि मनोरंजन देणारे ते परस्परावलंबी सहजीवन आज आपल्या विविधांगी संस्कृतीतून हरवले आहे.