शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

लिबियातील वाढत्या दहशतवादी कारवाया

By admin | Updated: February 21, 2015 02:16 IST

काही दिवसांपूर्वी इसीसने एका जॉर्र्डेनियन वैमानिकाला जाळून मारल्याची घटना ताजी असतानाच लिबियात आणखी एक अमानुष दहशतवादी घटना घडली आहे.

काही दिवसांपूर्वी इसीसने एका जॉर्र्डेनियन वैमानिकाला जाळून मारल्याची घटना ताजी असतानाच लिबियात आणखी एक अमानुष दहशतवादी घटना घडली आहे. ख्रिश्चन आणि मुस्लीम हे दोन्ही धर्म खरे तर मध्यपूर्वेत उदयाला आलेले. त्यामुळेच या भागात त्यांच्यातल्या तेढीला एक ऐतिहासिक परिमाण मिळत असते. २०१५च्या पहिल्या दोन महिन्यांमध्ये लिबिया, सिरीया, इराक, नायजेरिया यासारख्या मुस्लीमबहुल देशांमध्ये जवळपास साठपेक्षा जास्त ख्रिश्चनांना ठार केले गेले आहे, तर जवळपास पावणेदोनशेच्यावर ख्रिश्चन जखमी झाले आहेत. यातल्या बहुतेकांना गळे कापून किंवा जिवंत जाळून मारले गेले आहे. या शिवाय अनेक मुस्लीमही मारले गेले, ते अलाहिदा. गेल्या आठवड्यात इजिप्तमधून लिबियात गेलेल्या एकवीस ख्रिश्चन मजुरांचे शिरच्छेद करण्यात आले. जसे जॉर्डनने सिरीयातील इसीसच्या भागावर हवाई हल्ले केले, तसेच ही घटना घडल्यावर इजिप्तनेही लिबियावर हवाई हल्ले केले. त्याचे पडसाद लिबिया, इजिप्त आणि मध्यपूर्वेत उमटणे क्रमप्राप्त आहे. सध्या लिबियात यादवीसदृश स्थिती आहे. एका बाजूला गदाफीनंतर लिबियाची सत्ता हाती घेतलेले अब्दुल्ला अल थन्नी यांचे सरकार आणि दुसऱ्या बाजूला इसीसच्या छायेखालचे मुस्लीम अतिरेकी यांच्यात युध्दसदृश स्थिती आहे. इराक, सिरीया, लिबिया, इजिप्त या भागात ख्रिश्चनांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या प्रतिकारासाठी तिथे ख्रिश्चन मिलीशियाची स्थापना झाली आहे, आणि त्यात अनेक अमेरिकन व इतर भागातले युवक सामील होत आहेत. त्यातच अमेरिकेच्या लष्करात कधीकाळी काम करणारे आणि पूर्वेत लढलेले सैनिकही आहेत. लिबिया टुडे या वृत्तपत्राने याबद्दलचे एक वृत्त प्रकाशित केले आहे. त्यात द्राफ-नवशा हे त्या मिलीशियाचे नाव. असिरीयन भाषेत याचा अर्थ आहे, स्वयंप्रेरणेने केलेला त्याग. त्यात सहभागी झालेल्या ब्रेट नावाच्या आणि दंडावर क्रूसाचे गोंदण करून घेतलेल्या एका अमेरिकन युवकाचे एक वाक्य या वृत्तांतात दिले आहे. तो म्हणतो, एकाच्या दृष्टीने जो आतंकवाद असतो तो दुसऱ्याच्या दृष्टीने स्वातंत्र्यलढा असतो. काश्मीरच्या संदर्भातही पाक सरकारकडून अशीच भूमिका अनेकदा मांडली जाते, हे मुद्दाम लक्षात घेणे उचित ठरावे. इजिप्तने लिबियातल्या या कथित जिहादी अतिरेक्यांवर कारवाई करण्याची मागणी युनोकडे केली आहे, असेही हे वृत्तपत्र नमूद करते. अर्थात हे लिबियातल्या थन्नीसमर्थक भागातले वृत्तपत्र आहे. थन्नीसमर्थक भागातल्या लिबिया हेरॉल्ड या दुसऱ्या वर्तमानपत्राने लिबियात पकडलेल्या किंवा गायब झालेल्या इजिप्तच्या नागरिकांबद्दलचा एक ृवृत्तांत छापला आहे. त्यात लिबियन डॉन या इसीसच्या विरोधात लढणाऱ्या दुसऱ्या एका गटाने सुरक्षेच्या कारणासाठी इजिप्तच्या नागरिकांनी ४८ तासात लिबिया सोडावे, असे सांगितल्याचेही वृत्त आहे. सध्याचे इजिप्तचे शासक असणाऱ्या अब्दल-फतह-अल-सासी यांनी लिबियन सीमेशी जोडलेल्या भागाचा दौरा केल्याचे वृत्त इजिप्त इंडिपेंडंटने दिले आहे. यासंदर्भातच इजिप्तच्या अल-अहरामने अब्दल मोनियम सैद या त्यांच्या स्तंभलेखकाचा एक लेख प्रकाशित केला आहे. सैद यांनी इजिप्तमधल्या दहशतवादी कारवायांचा संक्षेपाने आढावा घेऊन या प्रकारे इजिप्तच्या राजकारणावर होणाऱ्या परिणामांचा आढावा घेतला आहे. दहशतवादाच्या विरोधातला लढा प्रभावी करण्यासाठी आणि आपली इजिप्तमधील राजवट भक्कम करण्यासाठी एक चांगली संधी या घटनांमुळे मिळत आहे, असे मत अल-अहरामच्या लेखात सैद यांनी मांडले आहे. दहशतवादाविरोधी लढाईत दहशतवाद्यांना सरळ सामोरे जायचे असते आणि त्यांचा खातमा करायचा असतो. वाटाघाटींच्या मार्गाने फारसा फायदा होताना दिसत नाही, असेही तो नमूद करतो. याबाबत जॉर्डनच्या वैमानिकाच्या प्रकरणात वाटाघाटी कशा चुकीच्या ठरल्या, याचा हवाला तो देतो आणि सांगतो की, अचूक आणि पुरेशी माहिती मिळवणे आणि जनतेचे संपूर्ण सहकार्य या लढ्यात मिळवणे आवश्यक असते. दहशतवाद्यांना आपले लक्ष्य (सॉफ्ट टार्गेट्स) सहजासहजी मिळवता येणार नाही याची खबरदारी घेणेसुध्दा आवश्यक आहे. यासाठी आपली (इजिप्तची) सुरक्षा दले नेहमीच सज्ज अवस्थेत असली पाहिजेत, असेही सैद बजावतात. याच विषयावर वॉशिंग्टन पोस्टने इरिन कनिंगहॅम या मध्यपूर्वेत काम करणाऱ्या पत्रकाराने पाठवलेला एक वृतांत प्रकाशित केला आहे. दहशतवाद्यांच्या कृत्यांमुळे मध्य पूर्वेतले अनेक देश आज आतंकवादी संघटनांच्या विरोधात उभे ठाकत आहेत. मागच्या घटनेनंतर जॉर्डनने इसीसवर हवाई हल्ले केले. आतासुध्दा इजिप्तने लिबियामधल्या अतिरेक्यांवर हवाई हल्ले केले आहेत. पुढील काळात अशा हल्ल्यांंची संख्या वाढेल. दोन दिवसांपूर्वी लिबियाच्या व्यावसायिक विमानांना आपल्या देशावरून जायची परवानगी नाकारून दोन देशांमधला तणाव अधिकच वाढणार असल्याचे इजिप्तने दाखवून दिले आहे. एका महत्वाच्या विषयाकडे डेली न्यूज, इजिप्त मधल्या आपल्या लेखात अम्र खलिफा यांनी लक्ष वेधले आहे. अतिरेकी हल्ल्यांमध्ये मारल्या गेलेल्या कुटुंबांच्या आर्थिक गरजांकडे आजवर (तिथल्या) शासकांनी लक्ष दिले नाही. सध्याच्या घटना ही एक संधी मानून सासींनी असे लक्ष दिले पाहिजे असेही ते सांगतात. अर्थात इजिप्तचे सासी स्वत:च्या देशातच मुस्लीम ब्रदरहूडसारख्या अतिरेक्यांशी सामना करीत आहेत. त्यामुळे पुढच्या काळात मध्यपूर्वेत कमालीचा तणाव आणि अस्थिरता निर्माण होणार आहे. -प्र्रा़ दिलीप फडके