शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

शेवटच्या लोकलचा तिढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:23 IST

मध्य रेल्वेच्या १ नोव्हेंबरपासून अमलात येणा-या नव्या वेळापत्रकात शेवटच्या लोकलची वेळ दहा मिनिटांनी अलीकडे आणण्याचा निर्णय झाला आहे. ११०० च्या घरात फे-या असलेल्या अगडबंब वेळापत्रकाच्या दृष्टीने विचार करता हा बदल तसा किरकोळ, रेल्वे कर्मचा-यांच्या सोयीचा वाटेल.

मध्य रेल्वेच्या १ नोव्हेंबरपासून अमलात येणाºया नव्या वेळापत्रकात शेवटच्या लोकलची वेळ दहा मिनिटांनी अलीकडे आणण्याचा निर्णय झाला आहे. ११०० च्या घरात फेºया असलेल्या अगडबंब वेळापत्रकाच्या दृष्टीने विचार करता हा बदल तसा किरकोळ, रेल्वे कर्मचाºयांच्या सोयीचा वाटेल. प्रवासी संघटनांनीही या निर्णयाची फारशी दखल घेतलेली नाही. प्रत्यक्षात मात्र ४० लाख प्रवाशांच्या दृष्टीने हा निर्णय-बदल अत्यंत महत्त्वाचा आणि त्यांच्या नियोजनावर परिणाम करणारा आहे. वस्तुत: पूर्वी मध्य रेल्वेच्या उपनगरी सेवांची वाहतूक रात्री पावणेतीन तास बंद राहत असे. हळूहळू कालावधी वाढवत नेत ती आता साडेतीन तास बंद राहते आहे. कधीही न झोपणाºया या महानगरात एकीकडे नाइटलाइफ सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. हॉटेल, रेस्टॉरंटसह मनोरंजनाची साधने रात्रभर खुली करण्यासाठी राजकीय चुरस-कुरघोडी सुरू आहेत. असे असताना वाहतुकीचे प्रमुख, तुलनेने स्वस्त आणि बºयापैकी वक्तशीर असलेले साधन बंद राहण्याचा काळ वाढवत नेण्याचा निर्णय उफराटा म्हणायला हवा. मुंबईच्या चलनवलनाचेच नव्हे, तर या शहराच्या व्यवहारांचे, रोजगाराचे, कॉर्पोरेट व्यवस्थेचे घड्याळ बदलत-बदलत आता अहोरात्र झाले आहे. गर्दीच्या दृष्टीने ‘पीक अवर’ ही संकल्पनाही मोडीत निघाली आहे. त्यामुळे शेवटची लोकल, पहिली लोकल ही संकल्पनाच बाद करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. नव्हे, ती येथील कामगार, नोकरदार, अर्थव्यवस्थेची गरज आहे. शिवाय अवघ्या देशातून रात्रभर लांब पल्ल्याच्या गाड्या या शहरात येत असतात. मध्यरात्री उतरणाºया या प्रवाशांना सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वेस्थानकांत थांबू दिले जात नाही. कुटुंबासह, सामानसुमानासह रस्त्यावर थांबणेही सुरक्षित नसते. त्यांचा विचार केला, तर मध्य रेल्वेच्या मुख्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर आणि पश्चिम रेल्वेमार्गावर रात्रभर लोकलची वाहतूक सुरू असणे गरजेचे आहे. नव्हे, शहराच्या बदललेल्या घड्याळाची ती गरज आहे. मुंबईहून सुटणाºया व तिकडे जाणाºया पहिल्या आणि शेवटच्या लोकलमधील गर्दीवर नजर टाकली की त्याची खात्री पटते. पूर्वीप्रमाणे विशिष्ट वेळेनंतर लोकलमध्ये चढायला मिळेल, बसायला मिळेल, अशी स्थिती उरलेली नाही. त्यामुळचे शेवटच्या लोकलची वेळ अलीकडे आणण्याचा निर्णय बदलण्याची, तो पूर्ववत करण्याची, प्रसंगी आणखी पुढे नेण्याची गरज आहे. त्याच वेळी मुंबईसह एमएमआरडीएच्या क्षेत्रात रात्रभर लोकल, परिवहन सेवा कशासुरू राहतील त्याचा विचार करून अंमलबजावणीची वेळ आलीआहे.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकल