शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
4
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
5
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
6
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
7
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
8
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
9
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
10
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
11
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
12
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
13
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
14
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
15
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
16
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
17
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
18
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
20
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण

पर्यटन उद्योगातून कोकणसमृद्धी

By admin | Updated: March 22, 2015 01:26 IST

प्रचंड नैसर्गिक समृद्धी असूनही कोकणचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. कोकणवासीयांची मानसिकता, शासनाची उदासीनता, दूरदृष्टी व नियोजनाचा अभाव अशी अनेक कारणे यामागे आहेत.

प्रचंड नैसर्गिक समृद्धी असूनही कोकणचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. कोकणवासीयांची मानसिकता, शासनाची उदासीनता, दूरदृष्टी व नियोजनाचा अभाव अशी अनेक कारणे यामागे आहेत. यावर चर्चा करण्यापेक्षा अ‍ॅक्शन प्लॅन बनवून आम्ही कोकणवासीयांनी यावर काम केले पाहिजे.पर्यटन, वनौषधी, फलोद्यान, फळप्रक्रिया, मत्स्योद्योग ही कोकण विकासाची पंचसूत्री आहे. याच्या केंद्रस्थानी पर्यटन उद्योग आहे. पर्यटन उद्योगाच्या विकासाबरोबरच अन्य विषयांचा झपाट्याने विकास होऊ शकतो. पुढील काळात देश महासत्ता होणार असेल तर कोकणातही याची सुरुवात करणे करणे गरजेचे आहे. थायलंड, मलेशिया, मॉरिशस यासारख्या कोकणाहून छोट्या देशात दरवर्षी १ ते १.५ कोटी परदेशी पर्यटक येतात. पुढील १0-१५ वर्षात नीट नियोजन केले, तर कोकणातही इतके परदेशी व त्यांच्या पाचपट भारतीय पर्यटक येऊ शकतील. हे आम्ही प्रत्यक्ष घडवले तर कोकणातल्या एकाही तरुणाला छोट्या नोकरीसाठी मुंबई - पुण्यात यावे लागणार नाही. गेली बारा वर्षे कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सामाजिक चळवळ चालवत आहोत. कोकणात गावागावात प्रत्यक्ष काम करताना यासाठी काय केले पाहिजे याचे नियोजन आम्ही करीत आहोत. कोकणच्या विकासासाठी तीन स्तरांवर काम करणे गरजेचे आहे. यातील पहिला सर्वात महत्त्वाचा स्तर पायाभूत सुविधांचा विकास. महाराष्ट्रातील नव्या सरकारकडून खूप अपेक्षा आहेत. पुढील पाच वर्षांत पर्यटनाच्या पायाभूत सुविधांचा विकास होईल, असे वाटते. प्रत्येक जिल्ह्याचा पर्यटन विकासाचा आराखडा शासनाने बनवलेला आहे. यावर प्रत्यक्ष कार्यवाही अपेक्षित आहे. आज कोकणात बोर्डी, केढवा - माहिम, अर्नाळा, अलिबाग, मुरूड - जंजिरा, दिवेआगार, हरिहरेश्वर, हर्णे - मुरुड, गुहागर, गणपतीपुळे, रत्नागिरी, आंबोळगड, विजयदुर्ग, कुणकेश्वर अशी अनेक पर्यटनस्थळे विशेष प्रयत्न न करता लोकसहभागातून विकसित झाली आहेत. या प्रत्येक पर्यटनस्थळावर दरवर्षी एक ते वीस लाख पर्यटक येतात. बीच टुरिझम, बॅकवॉटर टुरिझम, धार्मिक पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन, निसर्गपर्यटन, हिलस्टेशन्स, अ‍ॅडव्हेंचर टुरिझम (साहसी पर्यटन), सांस्कृतिक पर्यटन असे अनेक पर्यटनाचे प्रकार ठरवून विकसित करता येतील. या प्रत्येक ठिकाणी पोहोचण्यासाठी चांगले रस्ते, मुबलक पार्किंगची व्यवस्था, पाणीपुरवठा, लहान मुलांसाठी उद्याने, समुद्रकिनाऱ्यावर व महत्त्वाच्या ठिकाणी कोकणी खाद्यपदार्थ देणारी आधुनिक रेस्टॉरंटस, पर्यटकांसाठी मनोरंजनाच्या सोयी, कोकणातील समृद्ध संस्कृती, मरिन लाइफ, सह्याद्री जैवविविधता, आदिवासी संस्कृती, फिशरमन व्हिलेज, ऐतिहासिक वारसा, स्थापत्यशास्त्र, विविध कला या विषयांवरील वैशिष्ट्यपूर्ण मुझियम्स इत्यादी अनेक सुविधा या पर्यटनस्थळांवर निर्माण केल्या पाहिजेत. याशिवाय पर्यावरणाची काळजी, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालय, शाश्वत पर्यटन विकास, विकासाच्या प्रक्रियेत ग्रामस्थांचा सहभाग अशा अनेक विषयांची काळजी नियोजनात घेणे आवश्यक आहे. या प्रत्येक स्थळाचा स्वतंत्र मास्टर प्लॅन करून पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने हे राबवणे गरजेचे आहे. युरोपमध्ये व्हीनस किंवा फ्लोरेन्स यासारख्या प्रमुख पर्यटनस्थळांवर वर्षाला एक कोटीहून अधिक पर्यटक येऊन सुद्धा कोणतीही गैरसोय होत नाही. मात्र दोन - पाच लाख पर्यटक वर्षाला आल्यानंतर आमच्या पर्यटनस्थळांची दुरवस्था पाहावत नाही. कोकण पर्यटन विकासासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट प्रशिक्षण. जर आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन कोकणात सुरू करायचे असेल तर कोकणातील पर्यटन व्यावसायिकांना आतंरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण द्यावेच लागेल. जगात सुरू असलेल्या पर्यटनाचा दर्जा व कोकणातील पर्यटन यातील तफावत कमी करावी लागेल. यासाठी कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात एक सुसज्ज पर्यटन प्रशिक्षण संस्था गरजेची आहे. लोकांनी, कोकणवासीयांनी चांगली निवासव्यवस्था उभारावी म्हणून समुद्रकिनारी व अन्य ठिकाणी सहजपणे परवानग्या, कमी व्याजदराने कर्जपुरवठा व काही ठिकाणी सबसिडी देण्याची आवश्यकता आहे. कोकणवासीय कधीच मदतीची अपेक्षा ठेवत नाहीत. परंतु नवीन शासनाने १० वर्षांकरिता कोकणातील पर्यटन उद्योगाला करसवलती दिल्या पाहिजेत. सर्वप्रकारची गुंतवणूक येथील पर्यटन उद्योगात येणे गरजेचे आहे. त्यामुळे कोट्यवधी देशी - विदेशी पर्यटक कोकणात येतील. देशाला विदेशी चलन मिळेल. प्रचंड मोठी अर्थव्यवस्था निर्माण होईल. पुढील महत्त्वाचा मुद्दा प्रसिद्धी. आज परदेशात व देशात सुद्धा निसर्गसमृद्ध कोकणची माहिती नाही. ग्लोबल कोकणच्या माध्यमातून कोकण पर्यटनाच्या आंतरराष्ट्रीय प्रसिद्धीची सुरुवात आम्ही केली आहे, परंतु हे पुरेसे नाही. या तीन स्तरावर नीट नियोजनपूर्वक काम झाले तर पुढील ५ - १0 वर्षांत आर्थिक समृद्ध कोकणाची निर्मिती होऊ शकेल. (लेखक हे कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष आहेत़)केरळची गेल्या वर्षाची पर्यटनाची आर्थिक उलाढाल २८ हजार कोटींची आहे. केरळला केवळ चार लाख विदेशी व जवळपास एक कोटी देशी पर्यटक जातात. यापेक्षा कितीतरी अधिक मोठी आर्थिक उलाढाल कोकणात पर्यटन उद्योगामुळे होऊ शकेल. त्यामुळे अनेक मुंबई - पुणेकर कोकणात जाऊन आपल्या गावात स्वत:चा उद्योग उभारू शकतील. जगभर पर्यटनाची मोठी प्रदर्शने होतात. जर्मनीतील आयटीबी बर्लिन व लंडनमधील डब्लूटीएम यासारख्या महत्त्वाच्या प्रदर्शनामध्ये कोकण सहभागी होणे गरजेचे आहे.संजय यादवराव