शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

जाण वास्तवाची

By admin | Updated: February 23, 2015 00:05 IST

आज संगणक युगात बदलत्या वास्तवाची चाहूल घेण्याची क्षमता असलेलं मन हवं आहे. कठोर परिश्रम, दृढ आत्मविश्वास, प्रबळ इच्छाशक्ती, सकारात्मक दृष्टिकोन, योग्य नियोजन

डॉ. कुमुद गोसावी - आज संगणक युगात बदलत्या वास्तवाची चाहूल घेण्याची क्षमता असलेलं मन हवं आहे. कठोर परिश्रम, दृढ आत्मविश्वास, प्रबळ इच्छाशक्ती, सकारात्मक दृष्टिकोन, योग्य नियोजन नि त्यासोबत शांत, संयमी, विवेकी मन! ही यशाची ‘गुरुकिल्ली’ हाती देणारं अध्यात्म जाणून घ्यायला हवं!रामायणातील एका प्रसंगी नल, नील, सुग्रीव, लक्ष्मण आदिंनी बिभीषणाला आसरा देऊ नये असं सांगितलं, तेव्हा प्रभू रामचंद्रानं त्या सर्वांसमक्ष हनुमंताला त्यासंबंधी विचारलं, बिभीषणाची भगवद्भक्ती।शुद्ध भावार्थी बिभीषण।बिभीषणाच्या अंत:करणात अंशमात्र कपट नाही. तो शांत, धर्ममूर्ती आहे, त्याचं प्रभू रामचंद्रांवर नितांत प्रेम आहे. शिवाय तो रघुनाथाला अनन्यभावानं शरण आला आहे. त्याची कन्या ‘त्रिअरा’ अशोकवनात सीतेचा सांभाळ करीत आहे. यानं माझा वध होऊ दिला नाही. हनुमंतानं बिभीषणाच्या पवित्र अंत:करणाची अशी वास्तव जाणीव करून दिली! महाबली हनुमंत केवळ वास्तवदर्शीच नव्हते, तर श्रेष्ठ संगीततज्ज्ञही होते! कुंभकोणमला वीणावादन करणाऱ्या हनुमंताची मूर्ती आहे. आम्ही आज संपत्ती वाढवली नि माणुसकी गमावली. एकदा प्रवासात समोर बसलेल्या मुलांनी पिझ्झा, बर्गर, केक आदि पदार्थांचा फडशा पाडला नि त्याचे रॅपर्स भिरकावून दिले! समोरच्या सीटवरील पाठीत वाकलेल्या आजी काठी टेकवत टेकवत आल्या नि कचरा गोळा करू लागल्या. एकीनं विचारलं, आजीबाई तुम्ही कशाला त्रास घेताय? रेल्वेत डस्टबिन असतात हे तुम्ही हसण्याच्या नादात विसरलात म्हणून ते गोळा करतेय. खिदळणारी मुले नरमली नि सॉरी आजीबाई, म्हणून मोकळी झाली!विश्वविख्यात ज्ञानेश्वरी ग्रंथातील वास्तवदर्शी दृष्टांताचं लेणं म्हणजेच नक्षत्रांचं देणंच म्हणायला हवं!का कमळावरी भ्रमर। पाय ठेविती हळुवार।कुचंबैल केसर। ह्या शंका।। ज्ञाने. १३.२४७।।खरा ज्ञानी माणूस आपल्याकडून कोणाचीही हिंसा होऊ नये, अगदी कमळातील केसरदेखील कुचंबू नये-दुखाऊ नये, इतकं मनाचं हळुवारपण त्यानं जपावं यातच त्याच्यातील अतिशय नाजूक, तरल संवेदनांची ओळख होते.अरे संसार संसार। जसा तवा चुल्यावर।आधी हाताला चटके। तेव्हा मिळते भाकर।।संत ज्ञानदेव माउलीच्या वास्तवदर्शी दृष्टांताप्रमाणे बहिणाबाई चौधरी यांच्या या संसारचित्रणातील हे लक्षवेधी वास्तवही असंच बोलकं आहे, नाही का?