शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
5
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
6
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
7
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
8
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
9
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
10
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
11
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
12
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
13
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
14
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
15
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
16
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
17
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
18
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
19
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
20
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय

सातपुड्यातील किसन

By admin | Updated: May 14, 2015 23:33 IST

सातपुड्यातील अतिदुर्गम अशा बर्डीपाडा या छोट्या पाड्यातील किसन तडवी या तरुणाने दोहा (कतार) येथे झालेल्या पहिल्या आशियाई युवा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत तीन हजार

मिलिंंद कुलकर्णी -

सातपुड्यातील अतिदुर्गम अशा बर्डीपाडा या छोट्या पाड्यातील किसन तडवी या तरुणाने दोहा (कतार) येथे झालेल्या पहिल्या आशियाई युवा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत तीन हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. किसनच्या या देदीप्यमान कामगिरीने बर्डीपाडा अचानक प्रकाशात आले. अक्कलकुवा तालुक्यात अनेक पाड्यांचे एकत्रित असे हे बर्डीपाडा. एकूण लोकसंख्या एक हजार. किसनचे वडील नरसी रेड्या तडवी आणि आई गेनाबाई तडवी हे दोघे अशिक्षित. इतर आदिवासी कुटुंबांसारखी जेमतेम आर्थिक स्थिती. किसनने गावातल्याच शासकीय आश्रमशाळेत शिक्षणाला सुरुवात केली. घरच्या शेळ्यांना चरण्यासाठी जंगलात घेऊन जातानाच ‘धावण्या’ची कला विकसित होत गेली. मोठा भाऊ फुलसिंग हा शिकून ग्रामविकास अधिकारी झाला. त्याला किसनमधील क्रीडानैपुण्य लक्षात आले. किसनची आवड आणि गती लक्षात घेऊन त्याला प्रशिक्षण द्यायचा निर्धार फुलसिंगने घेतला. नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमध्ये प्रवेश मिळाला. हरियाणातील प्रशिक्षक विजेंदर सिंग यांनी किसनचे गुण हेरले आणि त्याला शास्त्रोक्त प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. भाऊ फुलसिंग आणि प्रशिक्षक विजेंदर सिंग यांचा विश्वास किसनने आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून सार्थ ठरविला. कोलंबिया येथे होणाऱ्या विश्व युवा अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी भारतीय संघात आता किसनची निवड निश्चित मानली जात आहे. किसन तडवीची ही यशोगाथा निश्चितच प्रेरक आहे. किसनसारखेच अनेक उदयोन्मुख खेळाडू सातपुड्यात योग्य संधीची वाट पाहत आहेत. त्यांना कुणी फुलसिंग आणि विजेंदर सिंग भेटतील काय, हा प्रश्न आहे. किसनच्या निमित्ताने खान्देशातील आदिवासी तरुणांच्या शिक्षण आणि क्रीडानैपुण्याचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. सातपुड्याच्या अंगाखांद्यावर खेळणाऱ्या काटक आणि चपळ आदिवासी तरुणांना प्रशिक्षणाच्या घोषणा अनेकदा झाल्या. पण त्या कागदावरच राहिल्या. खान्देशातील ११ तालुके आदिवासीबहुल आहेत. आदिवासी विकास व क्रीडामंत्रिपद नंदुरबार जिल्ह्याकडे अनेक वर्षे होते. तरी एखादा किसन प्रकाशझोतात येतो आणि उर्वरित अंधारात चाचपडत राहतात, हे कशाचे द्योतक आहे? क्रीडा संकुलांचे भिजत घोंगडेतालुकानिहाय क्रीडा संकुलाची घोषणा तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने केली होती. परंतु खान्देशातील कोणत्याही तालुक्यात क्रीडा संकुल पूर्ण झालेले नाही. कोठे जागेचा प्रश्न आहे, कोठे जागा आहे तर ठेकेदार मिळत नाही, ठेकेदार मिळाला तर निधीची अडचण अशा एक ना अनेक प्रश्नांनी क्रीडा संकुलांचे भिजत घोंगडे कायम आहे. क्रिकेटसारख्या खेळांना सगळ्यांकडून अवास्तव प्रोत्साहन मिळत असताना भारतीय क्रीडा प्रकारांकडे दुर्लक्ष होत आहे. आॅलिम्पिक, आशियाई स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर या विषयावर चर्चा झडतात आणि नंतर पुन्हा हा विषय थंडबस्त्यात पडतो. जिल्हा बँकांचे कल खान्देशातील नंदुरबार-धुळे व जळगाव जिल्हा बँकांच्या निवडणुकांचे कल खान्देशातील भविष्यातील राजकारणाची दिशा स्पष्ट करणारे आहेत. लोकसभा-विधानसभा निवडणुकांनंतर सहकार क्षेत्रातील निवडणुका झाल्या. त्याला राजकीयदृष्ट्या महत्त्व होते. धुळे-नंदुरबार जिल्हा बँक गैरव्यवहाराच्या आरोपावरून तीन वर्षांपूर्वी बरखास्त करण्यात आली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पॅनलने पुन्हा ही बँक ताब्यात घेण्यासाठी एकसंधपणे प्रयत्न केले. भाजपाने प्रथमच स्वतंत्र पॅनल उभे करण्याचे धाडस केले. पण भाजपाच्या काही लोकप्रतिनिधींनी असहकार्याचे धोरण अवलंबल्याने दारुण पराभव झाला. याउलट जळगावात खडसे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीतील दुहीचा लाभ उठवत प्रथमच एकहाती सत्ता मिळवली. पाच वर्षांपूर्वी भाजपाचे केवळ दोन संचालक होते. यंदा भाजपाने निर्विवाद वर्चस्व मिळविले. अर्थात काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेची गरजेपुरती घेतलेली साथ लाभदायक ठरली.