शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

तर अशी साहित्य संमेलने उठवळच ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 02:21 IST

साहित्य संमेलनाध्यक्षांची निवड गुणात्मक व्हावी, ती अविरोधच व्हायला हवी. पण पुढच्या काळात ते अशक्य आहे. ज्यांचे वाङ्मयीन कर्तृत्व आहे त्यांना या घाणेरड्या राजकारणात पडायचे नाही. त्यामुळे पुढच्या काळात अनेक हवसे-गवसे संमेलनाध्यक्षांच्या निवडणुकीत उतरतील.

- गजानन जानभोरसाहित्य संमेलनाध्यक्षांची निवड गुणात्मक व्हावी, ती अविरोधच व्हायला हवी. पण पुढच्या काळात ते अशक्य आहे. ज्यांचे वाङ्मयीन कर्तृत्व आहे त्यांना या घाणेरड्या राजकारणात पडायचे नाही. त्यामुळे पुढच्या काळात अनेक हवसे-गवसे संमेलनाध्यक्षांच्या निवडणुकीत उतरतील. यात अगदी आरत्या रचणाºयांपासून तर चारोळ्या खरडणा-यांचीही गर्दी राहील..अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कसा असावा? खरे तर या प्रश्नाचे उत्तर मराठी वाचकांनी शोधायला हवे. पण तसे होत नाही. केवळ १ हजार ७२ मतदार या अध्यक्षाची पात्रता ठरवतात आणि नंतर साहित्य संमेलनाचे सोपस्कार पार पडतात. या निवडणुकीत १०० टक्के मतदान कधीच होत नाही. ८००-९०० मतदार मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान करतात. त्यातील बहुतांश आज्ञाधारक, मांडलिक चक्क कोरी मतपत्रिका संघ किंवा परिषदेच्या टोळीप्रमुखाला आणून देतात. मग टोळीप्रमुख अंतिम निर्णय घेतात.मागील काही वर्षांपासून सातत्याने हेच धंदे सुरू आहेत आणि अशाच पद्धतीने यंदाही बडोद्याचे संमेलनाध्यक्ष ठरणार आहेत. मराठवाडा साहित्य परिषदेचे कौतिकराव ठाले पाटील असोत किंवा विदर्भ साहित्य संघाचे मनोहर म्हैसाळकर या दोघांकडेच या निवडणुकीची सूत्रे असतात. ठाले पाटलांचे समजून घेता येईल, ते प्राचार्य होते, मराठी भाषेचे तज्ज्ञ आहेत. पण म्हैसाळकरांचा तर साहित्याशी तीळमात्र संबंध नाही. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष त्याच्या वाङ्मयीन कर्तृत्वाऐवजी लांगूलचालनातून, घाणेरड्या राजकारणातून निवडला जात असेल तर मग अशी संमेलनेच उठवळ ठरतात. हे राजकारण केवळ संमेलनाध्यक्षांपुरतेच मर्यादित नसते. संमेलनातील परिसंवाद, कविसंमेलनातील वक्ते, कवींमध्ये काही सन्माननीय अपवाद वगळता खुशमस्करेच अधिक असतात. संमेलनाध्यक्षांच्या भाषणात औपचारिक चिंतन असते पण कृतिकार्यक्रम नसतो. फार जुने कशाला? मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी वर्षभर काय केले? अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धार्मिक असहिष्णूता, गौरी लंकेश यांची हत्या अशा अनेक ज्वलंत प्रश्नांवरची त्यांची साक्षेपी मते मराठी जनांना कळायला नको? हा प्रश्न केवळ डॉ. काळेंपुरता मर्यादित नाही. आजवरच्या बहुतांश संमेलनाध्यक्षांनी (काही अपवाद आहेत) सुद्धा विशेष काहीच केले नाही. त्यामुळे यंदाच्या साहित्य संमेलनातही फक्त पुनरावृत्ती होईल. हा निराशेचा सूर नाही. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अशी संमेलने आवश्यक आहेतच. पण संमेलनाध्यक्षांच्या निवडणुकीमागील पाताळयंत्री राजकारण संपायला हवे. याच राजकारणामुळे विंदा करंदीकर, इंदिरा संत, भालचंद्र नेमाडे या प्रज्ञावंतांना अध्यक्ष व्हावेसे वाटले नाही. डॉ. यशवंत मनोहर, सुरेश द्वादशीवार या ज्येष्ठ साहित्यिक-विचारवंतांनी संमेलनाध्यक्ष व्हावे असे ठाले पाटील-म्हैसाळकरांना का वाटत नाही? कारण अगदी सोपे आहे, त्यांच्यासमोर आपले खुजेपण ठसठशीतपणे दिसेल, ही भीती त्यांना नेहमी वाटत असते.संमेलनाध्यक्षांची निवड गुणात्मक व्हावी, ती अविरोधच व्हायला हवी. पण पुढच्या काळात ते अशक्य आहे. ज्यांचे वाङ्मयीन कर्तृत्व आहे त्यांना या घाणेरड्या राजकारणात पडायचे नाही. त्यामुळे पुढच्या काळात अनेक हवसे-गवसे संमेलनाध्यक्षांच्या निवडणुकीत उतरतील. यात अगदी आरत्या रचणाºयांपासून तर चारोळ्या खरडणाºयांचीही गर्दी राहील. या साहित्य संमेलनांना मराठी भाषा-संस्कृतीशी काहीच सोयरसुतक नाही. मराठी माणूस तसाही आता अलिप्त आहेच,पुढच्या काळात तो त्रयस्थ होईल. 

टॅग्स :marathiमराठी