शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

ऐन पावसाळ्यात नालेसफाई होणार तरी कशी?

By admin | Updated: June 5, 2017 03:37 IST

पावसाचे स्वागत करण्यासाठी भिवंडी महानगरपालिका कधीच सज्ज झालेली दिसून येत नाही

पंढरीनाथ कुंभारपावसाचे स्वागत करण्यासाठी भिवंडी महानगरपालिका कधीच सज्ज झालेली दिसून येत नाही. दरवर्षी पावसापूर्वीची कामे रखडल्याचे रडगाणे कमीअधिक प्रमाणात मनपात सुरू असते.या वर्षी पावसाने मे महिन्याच्या अखेरीस हजेरी लावून झटका दिला. पहिल्याच पावसात शहराची दैना झाली. अलीकडेच सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. त्याची धामधूम संपत असताना अचानक पावसाने हजेरी लावल्याने प्रशासनाला आम्ही निवडणुकीच्या रामरगाड्यात अडकलो असल्याने पावसाळी कामांची तयारी करायला वेळ मिळाला नाही, अशी सबब सांगण्याची संधी मिळाली. निवडणूक आचारसंहितेच्या नावाखाली प्रशासनाने अत्यावश्यक नालेसफाईदेखील प्राधान्याने केली नाही. खरेतर, अशा नैमित्तिक कामाकरिता आचारसंहितेचा अडसर असत नाही. मात्र, भिवंडीतील सुस्त, बेशिस्त प्रशासन अशी कारणे नेहमीच शोधत असते. नालेसफाईसाठी अंदाजपत्रकात आर्थिक तरतूद केली आहे. मात्र, निवडणूक निकाल लागल्यावर निविदा प्रक्रिया पार पाडून ही कामे करणे म्हणजे वरातीमागून घोडे घेऊन येण्यासारखे आहे. नालेसफाईचा बोजवारा उडाला, त्याचे कारण असे की, निवडणुकीपूर्वी मागवलेल्या नालेसफाईच्या निविदेस ठेकेदारांनी प्रतिसाद न दिल्याने पुन्हा निविदा मागवण्यात आल्या. तोपर्यंत आचारसंहिता लागू झालेली असल्याने त्याची मंजुरी अडकली. परिणामी, ठेकेदारांना कार्यादेश देणे अशक्य झाले. आता कार्यादेश दिल्यानंतर ४५ दिवसांत ठेकेदारांनी नालेसफाई करायची म्हटल्यावर अर्धा पावसाळा नालेसफाईतच जाणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे आता ही ‘नालेसफाई की, तिजोरी की सफाई’ अशी होणारी चर्चा दरवर्षीप्रमाणे यंदाही रंगणार आहे. गतवर्षी नालेसफाई योग्यरीत्या झाली नाही, अशा नागरिकांच्या तक्रारी असल्याने मनपा प्रशासनाने त्या ठेकेदारांची बिले थांबवली. परंतु, ठेकेदार प्रशासनापेक्षा हुशार आहेत. या वर्षी त्यांनी नवीन संस्थांच्या नावाने ठेके घेतले आहेत. गेल्या १० वर्षांपासून काम घेतलेला ठेकेदार प्रत्यक्ष नालेसफाई न करता दुसऱ्याच ठेकेदाराकडून नालेसफाईचे काम करून घेतो. मात्र, प्रशासन याची चौकशी करून कारवाई करीत नाही. नालेसफाई करणे, हे स्वच्छता विभागाचे काम असताना त्याचे ठेके मनपाच्या बांधकाम विभागामार्फत दिले जातात. त्यामागे कोणते अर्थकारण दडले आहे, ते बांधकाम विभागालाच ठाऊक. बांधकाम विभाग केवळ ठेका देऊन मोकळा होतो, तर नालेसफाई झाली की नाही, हे स्वच्छता विभाग पाहतो. दोन्ही विभाग परस्परांवर जबाबदारी ढकलत राहतात. गेल्या वर्षी वंजारपाटी येथील नाल्यातून जाणाऱ्या स्टेमच्या जलवाहिनीस अनेकांनी रबराच्या पाइपलाइन जोडून पाणी चोरण्याचे प्रकार केले. त्या पाइपमध्ये कचरा अडकून परिसरात पाणी साचले. लोकांच्या घराघरांत पाणी घुसले. स्थानिक नगरसेविकेच्या पतीने स्वत: नाल्यात उतरून त्याचा शोध घेतला. ते पाइप तोडून टाकले, तेव्हा स्टेमच्या पाणीचोरीचा प्रकार उघडकीस आला. शहरातील बहुतांश नाल्यांतून व मोठ्या गटारांतून मनपाच्या जलवाहिन्या, टेलिफोन केबल व विजेच्या केबल गेल्या आहेत. त्या केबलमध्ये पाणी अडकून पूरस्थिती निर्माण होते. हे माहीत असताना बांधकाम विभागाचे अभियंते त्यांच्यावर कारवाई करीत नाही किंवा या जलवाहिन्या व केबल रस्त्याच्या कडेला टाकण्यासाठी जागा उपलब्ध करून देत नाहीत.या वर्षी सुमारे दीड कोटी रुपये नाले व गटारसफाईवर खर्च होणार आहेत. आता ऐन पावसाळ्यात ही सफाई कशी होईल, याची चिंता नागरिकांना लागली आहे. >दरवर्षी भिवंडीत पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा बोजवारा उडालेला असतो. यंदा निवडणूक आचारसंहितेमुळे नालेसफाईचा ठेकेदार नियुक्त करणे शक्य झाले नाही, असे कारण दिले गेले. आता पाऊस सुरू होताना ठेका दिल्यावर ऐन पावसाळ्यात नालेसफाई ती काय होणार? या कामाचे दीड कोटी रुपये खिशात घालण्याचाच हा प्रकार आहे.