शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

पक्षीय राजकारणाच्या वेदीवर गोव्याचा बळी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 00:17 IST

गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असे तीन पक्षकार असलेली म्हादई जल लवादासमोरची सुनावणी निर्णायक टप्प्यात येऊन पोहोचलेली असतानाच गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना आलेली कर्नाटकची कणव आणि त्यांनी माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना लिहिलेले पत्र गोव्यातील राजकीय तापमान वाढवणारे ठरले आहे.

-अनंत साळकरगोव्याची जीनवदायिनी असे जिला संबोधले जाते त्या मांडवी किंवा म्हादई नदीच्या स्रोतांवर बांध घालून ते पाणी मलप्रभा खोºयांत वळवण्यासाठी कर्नाटक निरावरी निगमने प्रयत्न सुरू केल्यास दशक लोटले आहे. यासंदर्भात गोवा आणि कर्नाटक यांच्यात सुरू असलेले जललवादासमोरचे वाक्युद्ध निर्णायक स्तरापर्यंत येऊन ठेपले आहे. मात्र अचानक गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कर्नाटकातल्या दुष्काळग्रस्त भागांची पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी गोवा मानवतावादी भूमिका घेण्यास तयार असल्याचे सांगत याविषयी निर्माण झालेला तिढा सोडवण्याची तयारी दाखविल्याने गोव्यात गदारोळ माजला आहे़ अर्थात पर्रीकरांची ही भूमिका कितपत गांभीर्याने घ्यावी असाही प्रश्न येथे उपस्थित झालेला आहे. कारण त्यांनी जे पत्र लिहिले आहे ते कर्नाटकातील भाजपाचे नेते व माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांना संबोधलेले आहे. या प्रश्नाला काडीचेही न्यायिक महत्त्व नाही, त्यांनी ते पत्र जललवादाला किंवा कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना लिहिले असते तरच ती गोव्याची अधिकृत भूमिका आहे असे म्हणता आले असते.गोव्याने कर्नाटकला कळसा प्रकल्पापासून रोखण्यासाठी या संदर्भातली याचिका प्रारंभी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आणि त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने नोव्हेंबर २०१० मध्ये म्हादई जलविवाद लवादाची निर्मिती झाली़ आजपर्यंत लवादाने एकूण १०० सुनावण्या घेतलेल्या असून, १०१वी सुनावणी ६ फेब्रुवारी २०१८ रोजी सुरू होणार आहे आणि ती सुमारे एक महिना चालू राहणार आहे़ या सुनावणीत महाराष्ट्रदेखील एक पक्षकार असून त्याचा युक्तिवाद कर्नाटकाला पूरक असाच राहिलेला आहे. खुद्द महाराष्ट्रानेही विर्डी येथे अशाच प्रकारचे धरण बांधून गोव्याकडले पाणी रोखण्यासाठी पावले उचलली आहेत. आतापर्यंत तिन्ही राज्यांनी म्हादईवरच्या आपल्या हक्कांच्या संदर्भात जे दावे-प्रतिदावे केलेले आहेत त्याला अनुसरून लवादासमोर आलेल्या साक्षीदारांची फेरतपासणी झालेली असून, आता तिन्ही राज्यांना याविषयीचे लेखी सादरीकरण १५ जानेवारी २०१८ पर्यंत सादर करणे बंधनकारक आहे आणि त्यामुळे तिन्ही राज्यातल्या जलसंसाधन खात्यांचे संबंधित अधिकारी लेखी सादरीकरणाच्या तयारीत गुंतलेले असताना, पर्रीकर यांनी पक्षप्रेमापोटी केलेला पत्रोपचार गोव्यात राळ उडवू लागला आहे.सोमवारी, दि. १ रोजी गोव्यातील अनेक बिगर सरकारी संघटनांनी संयुक्त बैठक घेत पर्रीकरांच्या या पत्राविषयी जाहीर निषेध व्यक्त करीत आंदोलनाचे सूतोवाच केलेले आहे. आपले पत्र नियमांच्या चौकटीत असून आपण गोव्याच्या हितासंबंधी कदापि तडजोड करणार नसल्याचे पर्रीकर आता सांगत आहेत. बोलणी करण्याची तयारी दाखवली म्हणजे आपण पाणी दिलेले नाही असेही ते सांगताहेत. पर्रीकरांच्या सरकारात सामील असलेल्या गोवा फॉरवर्ड आणि मगोप या स्थानिक पक्षांनी पाणीवाटपाची चर्चाच नको अशी भूमिका घेतलेली आहे. मात्र राज्यातला प्रमुख विरोधी पक्ष असलेला काँग्रेस याबाबतीत गुळमुळीत धोरण अवलंबिताना दिसतो. कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या हातात कोलित द्यायचे नाही या धोरणाने हे मौन त्या पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी स्वीकारलेले आहे. पक्षीय राजकारणाच्या वेदीवर गोव्यासारख्या केवळ तीन खासदार देणाºया राज्याच्या हिताचा बळी दिला जातोय की काय हा प्रश्न एकंदर घटनाक्रमाने ऐरणीवर आणलेला आहे.

टॅग्स :goaगोवाWaterपाणीKarnatakकर्नाटक