शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

मेलो तरी बेहत्तर, पण धाेकादायक इमारतीमधील घर नाही सोडणार

By संदीप प्रधान | Updated: September 25, 2023 09:15 IST

माणसाचे सरासरी आयुर्मान ७० वर्षे धरले, तर एका जन्मात तो दोन घरांत आयुष्य काढतो.

संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक

अतिधोकादायक इमारतीत वास्तव्य केले, तर एक दिवस मृत्यू अटळ आहे, याची काय सर्वसामान्यांना कल्पना नसते का? शंभर टक्के कल्पना असते, पण राहते घर सोडून संक्रमण शिबिरात गेलो आणि इमारत जमीनदोस्त केल्यावर पुढे एकही वीट रचली गेली नाही, तर पुन्हा कधीच आपण आपल्या हक्काच्या घरात पाऊल ठेवू शकणार नाही, याची पक्की खात्री असल्याने, ‘मेलो तरी बेहत्तर, पण घर नाही सोडणार,’ असा हाराकिरीचा पवित्रा सर्वसामान्य माणूस घेतो. संक्रमण शिबिरातील अपमानास्पद जगण्यापेक्षा हक्काच्या घरातील मरण त्याला अधिक स्वाभिमानाचे वाटते. आपल्याकडील लोकप्रतिनिधी, नोकरशहा, इमारत मालक, बिल्डर यांचे हितसंबंध इतके खोलवर रुजलेले आहेत की, नव्या इमारतीत जुना रहिवासी पुन्हा येणार नाही, यासाठी सारे एकदिलाने कसोशीने प्रयत्न करतात.

माणसाचे सरासरी आयुर्मान ७० वर्षे धरले, तर एका जन्मात तो दोन घरांत आयुष्य काढतो. दादर, परळ, वरळी, लालबागमधील चाळीत लहानाचा मोठा झालेला, लग्नानंतर ठाणे, कल्याण, डोंबिवलीत संसार थाटतो. इमारत त्यापूर्वीच आठ ते दहा वर्षे अगोदर बांधलेली असेल, तर त्याचा २० ते २५ वर्षांचा संसार त्या घरात होतो. आता तोच साठीच्या घरात आलेला असतो. इमारत धोकादायक झालेली असते. मात्र, त्याची मिळकत बंद झालेली असते. मुले शिकून-सवरून अन्य शहरांत, विदेशात गेलेली असतात किंवा त्यांनी नव्या इमारतीत संसार थाटलेला असतो. त्यांना त्याची स्वप्ने पूर्ण करायची असतात. अशा वेळी महापालिका घर रिकामे करण्याच्या नोटिसा काढत असते, परंतु तो घर सोडायला तयार होत नाही. आपण उघड्यावर पडू. आपले डोळे मिटण्यापूर्वी पुन्हा येथे येऊच शकणार नाही, अशी भीती त्याला वाटत राहते. आपल्या व्यवस्थेत पुनर्विकास ही सर्वात दुर्लक्षित बाब आहे. लोकांना विस्थापित करायचे. मात्र, त्यांच्या पुनर्विकासाकडे साफ दुर्लक्ष करायचे, हाच सरकारी खाक्या राहिला आहे.

डोंबिवली पूर्वेतील आदिनारायण ही इमारत मागील आठवड्यात कोसळली व दोघांचा मृत्यू झाला. इमारत कोसळत असतानाही रहिवासी घराबाहेर पडले नाहीत. या निमित्ताने ‘लोकमत’ने यापूर्वी कोसळलेल्या इमारतींमधील रहिवाशांच्या पुनर्विकासाचा सखोल आढावा घेतला. महापालिकेने आतापर्यंत ६०० धोकादायक इमारतींपैकी ३१२ इमारती जमीनदोस्त केल्या. अजून २८८ धोकादायक इमारती आहेत. मात्र, अनेक पाडलेल्या इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन झालेले नाही. भाडेतत्त्वावर घरे दिलेल्या इमारतींबाबत हा प्रश्न तीव्र आहे. घर मालकाला घरे रिकामी करून हवी असल्याने, तो इमारतीच्या देखभालीकडे दुर्लक्ष करतो. इमारत धोकादायक होते किंवा तो यंत्रणेला हाताशी धरून धोकादायक ठरवतो. काही प्रकरणांत तर महापालिकेकडून भोगवटा प्रमाणपत्र न घेताच, बिल्डरशी करार करून इमारत रिकामी करून घेतल्याचे लक्षात आलेय. बिल्डरनी फसवणूक केल्यावर भाडेकरू व मालक सारेच रस्त्यावर येतात. मालकीच्या घरांबाबत सर्व रहिवाशांचे एकमत हा मोठा कळीचा मुद्दा असतो. कोर्टकज्ज्यांमुळे अनेकदा त्यांचाही पुनर्विकास रखडतो. 

 नव्या बांधल्या जाणाऱ्या इमारतीमध्ये बाजारभावानुसार घर खरेदी करणाऱ्या ग्राहकाला जर पुनर्विकास प्रकल्प रखडला, तर रेराकडे दाद मागता येते. आपले घर सोडल्यावर तीन ते चार वर्षांत नव्या घरात राहायला येणार, याची खात्री पटणारी व्यवस्था निर्माण केली, तर कोण कशाला मरेपर्यंत जुनाट घरात राहील?

 सरकारने रेरा कायदा केला. मात्र, पुनर्विकासाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या घरांकरिता या कायद्याचे संरक्षण नाही. 

 

टॅग्स :Building Collapseइमारत दुर्घटनाMumbaiमुंबई