शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

सायबर गुन्हे हा आर्थिक दहशतवादच, सायबर सुरक्षेत भारत पिछाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 05:30 IST

इंटरनेट वापरात दुसरा क्रमांक; पण सायबर सुरक्षेत भारत पिछाडीवर

विजय दर्डा

सुमारे १३ लाख भारतीयांच्या डेबिट व क्रेडिट कार्डांचा तपशील ‘डार्क वेब’वर विक्रीसाठी उपलब्ध असल्याची बातमी मोठी विचित्र आहे. सायबर गुन्हेगारच काळ्या बाजारातून ही माहिती खरेदी करतील व त्याचा वापर फसवणूक व सायबर दरोड्यांसाठी करतील, हे उघड आहे. हे असे होण्याची ही काही पहिली वेळ नाही. भारतामधील सुमारे ३२ लाख डेबिट/क्रेडिट कार्ड सायबर गुन्हेगारांनी हॅक केल्याची बातमी गेल्याच वर्षी आली होती. यातून या कार्डधारकांचे नेमके किती नुकसान झाले, याची नक्की माहिती समोर आली नाही, पण ‘नॉर्टन सायबर सेक्युरिटी इनसाइट’च्या अहवालात वर्ष २०१७ मध्ये भारतीयांची सायबर गुन्ह्यांमध्ये १८.५ अब्ज डॉलरची फसवणूक झाल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

हा अहवाल असे सांगतो की, भारतात इंटरनेट वापरणाऱ्या प्रत्येक पाचपैकी दोन व्यक्ती कोणत्या तरी स्वरूपाच्या सायबर गुन्ह्यांना बळी पडत असतात. नुकसान होऊन गेल्यानंतर त्यांना फसवणूक झाल्याचे कळते. अशा नुकसानीची भारतात बहुधा कधीच भरपाई होत नाही. याची दोन कारणे आहेत. एक, आपल्याकडे सायबर गुन्हेगारी रोखण्याची सक्षम व्यवस्था नाही. तपासही तत्परतेने केला जात नाही. दुसरे म्हणजे, आपल्याकडे विम्याविषयी फारच कमी जागरूकता आहे. काही मोजक्याच विमा कंपन्या अशा प्रकारचा विमा उपलब्ध करतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, भारतात सायबर विम्याचा व्यवहार अमेरिकेच्या तुलनेत फक्त १.६ टक्के एवढा कमी आहे. अशा सायबर सुरक्षा विम्याच्या पॉलिसी बव्हंशी कंपन्या व मोठ्या संस्थांकडून घेतल्या जातात. व्यक्तिगत पातळीवर असा विमा उतरविणाऱ्यांची संख्या अगदीच नगण्य आहे. अशा विमा पॉलिसी मुख्यत: वसुली, फिशिंग आणि अनधिकृत आॅनलाइन व्यवहारांनी होणाºया नुकसानीच्या भरपाईसाठी असतात. अमेरिका व युरोपमधील विकसित देशांत सायबर सुरक्षेची स्थिती खूपच चांगली असल्याचे दिसते. माझा सुपुत्र देवेंद्र अमेरिकेत शिक्षण झाल्यावर तेथे नोकरी करत होता, तेव्हा एकदा त्याच्या बँक खात्यातून सायबर गुन्हेगारांनी सर्व रक्कम लंपास केली होती. बँकेकडे तक्रार केल्यावर अगदी जलदगतीने तपास झाला. तुम्ही विश्वास ठेवणार नाही, पण चोरट्यांनी लाटलेली सर्व रक्कम आठ दिवसांत पुन्हा देवेंद्रच्या बँक खात्यात जमा झाली होती, पण आपल्याकडे अजूनही असे शक्य होताना दिसत नाही. भारतीय रिझर्व्ह बँक माध्यमांमध्ये वेळोवेळी संदेश प्रसारित करून सावध करत असते, पण जागरूकतेअभावी लोक सायबर गुन्ह्यांना बळी पडतातच.

तुमच्या प्रॉव्हिडंट फंडात ८० हजार रुपयांनी वाढ करण्यात येणार आहे, असा ‘एसएमएस’ अलीकडेच अनेक लोकांना आला. यादीत नाव आहे का, ते तपासा, असे त्या संदेशात सांगितले गेले. त्यात दिलेली साइट लोकांनी उघडली, तेव्हा त्यांच्याकडे त्यांचा पॅन कार्ड नंबर मागण्यात आला. ज्यांनी सावधानता बाळगली नसेल, ते यात नक्की फसले असणार. विविध बँकांच्या नावाने फिशिंग मेसेजेस व फोन तर सारखे येत असतात आणि बरेच जण त्यातून हातोहात फसविले जातात! खरे तर जग जेवढ्या वेगाने डिजिटल होत आहे, तेवढ्याच वेगाने सायबर हल्ल्यांचा धोकाही वाढत आहे. तुमची अत्यंत महत्त्वपूर्ण व्यक्तिगत माहिती बेमालूमपणे चोरली जाते. अशा चोरलेल्या माहितीचा कुठे, केव्हा व कसा दुरुपयोग केला जाईल, याचा अंदाज करणेही कठीण आहे. हल्ली पैसे देण्या-घेण्याचे व्यवहार करण्यासाठी बरीच अ‍ॅप्स वापरली जातात. त्यामुळे आपले बँक खाते सायबर हल्ल्याला बळी पडण्याचा धोका कायम असतो. याच सप्टेंबरमध्ये सायबर गुन्ह्यांचा तपास व सायबर फॉरेन्सिक तंत्र या विषयावर दिल्लीत ‘सीबीआय’च्या मुख्यालयात पहिले राष्ट्रीय संमेलन आयोजित केले गेले होते. यातून भारत सायबर गुन्हेगारांचा पायबंद करण्याची ठोस व्यवस्था लवकरच उभी करू शकेल, अशी अपेक्षा ठेवू या. इंटरनेट वापरणाºयात दुसºया क्रमांकावर असल्याने भारताने सायबर गुन्ह्यांबाबत विशेष दक्ष राहण्याची गरज आहे.

एका इस्रायली कंपनीने तयार केलेले ‘स्पायवेअर’ भारतातील राजकीय नेते, व्यावसायिक, मीडिया हाऊस, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व मानवाधिकार कार्यकर्ते अशा अनेकांची हेरगिरी करण्यासाठी व्हॉट््सअ‍ॅपच्या माध्यमातून वापरले गेल्याची ताजी बातमीही तेवढीच चिंताजनक आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचाही फोन असाच हॅक केला गेल्याचा आरोप काँग्रेसने रविवारी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेलही अशाच हेरगिरीचे शिकार झाले आहेत. साहजिकच ही हेरगिरी कोणी व कोणासाठी केली, असा प्रश्न निर्माण होतो. या प्रश्नाचे उत्तर मिळायलाच हवे. अशा प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत की, अनेक शंकाकुशंका उत्पन्न होतात. सरकारने या सायबर गुन्हेगारांच्या कठोरतेने मुसक्या आवळायला हव्यात, जेणेकरून कोणाही भारतीयाच्या मनात त्याची व्यक्तिगत माहिती सायबर चोरांच्या हाती लागण्याची भीती राहणार नाही. लोकांनी याविरुद्ध आवाज उठवून सरकारला त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायला हवी.लेखक लोकमत वृत्त समुह एडिटोरियल बोर्डचे चेअरमन आहेत 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमbusinessव्यवसायBanking Sectorबँकिंग क्षेत्र