शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

चातुर्मास्यारंभ !

By admin | Updated: July 10, 2016 03:58 IST

परंपरेचा धागा चिवट असतो. सहजासहजी तो तुटत नाही का सुटत नाही. पंचांगाशी असलेले नाते टिकून आहे, ते संकष्टी नाही तर एकादशीमुळे, तेदेखील कॅलेंडरमध्ये दाखवलेले असल्यामुळे.

- रविप्रकाश कुलकर्णीपरंपरेचा धागा चिवट असतो. सहजासहजी तो तुटत नाही का सुटत नाही. पंचांगाशी असलेले नाते टिकून आहे, ते संकष्टी नाही तर एकादशीमुळे, तेदेखील कॅलेंडरमध्ये दाखवलेले असल्यामुळे. एरव्ही आपला संबंध असतो तो इसवीसन दाखवणाऱ्या (ग्रेगरीअन) कॅलेंडरशी. पाऊस आला की वातावरण बदलते. आषाढाची ती चाहूलखुण असते आणि आषाढ म्हटला की, अजूनही 'आषाढस्थ प्रथम दिने' म्हणणाऱ्या कालिदासाची आठवण अपरिहार्यच. जरी संस्कृतशी तसा संबंध राहिला नाही तरी! हा संस्काराचा कळत-नकळत झालेला संस्कार, नाहीतर दुसरे काय? मग येते ती आषाढी एकादशी- पंढरपूरची वारी चातुर्मास्यारंभाची सुरुवात. आषाढ शुद्ध एकादशी ते कार्मिक शुद्ध एकादशी हा तो चर्तुमास (तारखेप्रमाणे यंदा १५ जुलैला सुरुवात आहे) व्रतवैकल्य, जपजाप्य आणि कुठकुठले यमनियम. शरीर आणि मन यांना भरकटण्यापासून वाचवण्यासाठी केलेली ही योजना. त्यासाठी वेगवेगळे उपक्रम यामागे हेच सूत्र दिसते. सण, उत्सव, नेम आणि व्रत यामागची भूमिका हीच आहे, असणार. चार्तुमासातील एक आचार म्हणजे ग्रंथवाचन. चातुर्मास्याचा हा काळ उपासना करण्यासाठी व ती वाढविण्यासाठी फारच अनुकूल असतो. कारण या पर्वकाळातील केलेली कृत्ये फलदायी होतात, असा अनुभव असल्याने या चार महिन्यांत शरीर आणि मन यांना शिस्त लागण्यासाठी विशेष आचार-विचारांची सांगड घालण्याचा प्रयत्न होतो. मनाला संयम करण्याची सवय लागते आणि त्यायोगे ते अधिक प्रभावशाली बनते हे दिसून येते. यामुळे असेल या चार महिन्यांत विविध ठिकाणी ग्रंथपठणाचे सार्वजनिक आयोजन केलेले दिसते. अशा ठिकाणी एक जण ज्याचा आवाज खणखणीत आहे, असा ग्रंथ वाचतो आणि त्याचे विवेचनही करतो, जे त्या ग्रंथातच केलेले असते. सर्वसाधारणपणे ज्ञानेश्वरी, पांडवप्रताप, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा, दासबोध अशा धार्मिक ग्रंथांचा वाचनात समावेश असतो, पण हे श्रवण नेहमी आपण म्हणतो, ते श्रवण नसते तर त्यात कुठेतरी श्रद्धेचा अंत असतो. मी जे काही करतो आहे, ते पुण्याकर्म असून त्याचे मला फळ मिळेल, अशी आता त्यामागे असतेच असते. ‘एक तरी ओवी अनुभवावी’ यामागे तो अर्थ आहे. हा एक प्रकारचा गुंता आहे खरा. याचे सुरेख अनुभवामृत दि. बा.मोकाशी यांच्या ‘आमोद सुवासी आले’ या कथेत आलेआहे.बाकी श्रोते हे श्रवण करतात. त्याचा आनंद घेतात. ज्या काळात ग्रंथ ही गोष्टच दुर्मीळ होती. आर्थिकदृष्ट्यासुद्धा आणि साक्षरतेचा प्रसारदेखील तळागाळात पोचला नव्हता, अशा काळातील ही व्यवस्था होती. एक प्रकारे त्या काळातला हा बुक क्लब होता, असे म्हणावे काय? श्रद्धेचे हे बळ मिळत असावंतुकाराम महाराजांनी म्हटले आहे - उदंड पाहिले, उदंड ऐकिलेउदंड वर्णिले, क्षेत्र महिमेऐसी चंद्रभागा ऐसे भिमातीरऐसे संतजन ऐसे हरिदासऐसा नामघोष सांगा कोठेतुका म्हणे आम्हा आकाश कारणेपंढरी निर्माण केली देणेपण सगळ्यांनाच त्या पंढरीत प्रत्यक्ष जाता-पाहता येत नाही. वारी आणि चतुर्मासाची सांगड अशी घातली गेली असेल का?निसर्ग आणि माणसे यांचे नाते सांभाळण्याचाच प्रकार एके काळी सांगितलेला दिसतो, पण माझ्या आजच्या जीवनकाळात तो बसवता येऊ शकतो काय?आजच्या घडीला त्याची आवश्यकता समर्थपणे मांडण्याची गरज आहे, असे वाटते, पण खरे सांगायचे तर आम्ही संभ्रमावस्थेत आहोत. जुने आम्हाला धरवत नाही, नव्याला सामोरे जाता येत नाही. कारण त्याचा नक्की ठावठिकाणा आम्हालाच ठाऊक नाही...अशा वेळी ना. ग. गोरे यांची आठवण येते.नानासाहेब गोरे म्हणजे पूर्ण नास्तिक, बुद्धिवादाची कास धारणारे असा त्यांचा लौकिक होता, पण पंढरपूरला ते गेले, तेव्हा विठोबासमोर ते नतमस्तक झाले! नानासाहेबांनी लिहिले आहे, जिथे पिढ्यान्पिढ्या लक्षावधी स्त्री-पुरुषांनी लोटांगण घातले, तिथे हातही न जोडणारा मी कोण? असा सवाल हृदयातून आला व माझे हात मी जोडले!चातुर्मासारंभाच्या निमित्ताने असे काय-काय आठवत आहे. वास्तविक, लं. रा. पांगारकरांचा 'भक्तिमार्गप्रदीप' याची जन्मकथा ज्याने एके काळी ग्रंथ विक्रीचा उच्चांक केला. संपूर्ण चातुर्मास कसे निघाले, त्याबद्दल सांगायचे होते, पण त्यासाठी पुढचे चार महिने आहेतच की.