शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
3
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
4
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
5
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
6
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
7
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
8
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
9
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
10
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
11
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
12
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
13
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
14
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
15
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
16
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
17
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
18
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
20
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!

भाष्य - अभिनयकलेचा सन्मान

By admin | Updated: June 1, 2017 00:14 IST

मराठी रंगभूमी, चित्रपट, मालिका तसेच हिंदी चित्रपट अशा मोठ्या अवकाशात मुक्त भ्रमंती करणारे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना

मराठी रंगभूमी, चित्रपट, मालिका तसेच हिंदी चित्रपट अशा मोठ्या अवकाशात मुक्त भ्रमंती करणारे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर होणे म्हणजे मराठी अभिनयकलेचाच सन्मान म्हणावा लागेल. मराठी कलाक्षेत्रात हरहुन्नरी अभिनेता हे विशेषण ज्यांना ज्यांना चपखल लागू पडते, त्यात मोहन जोशी यांचे नाव बरेच वर आहे. रंगमंच, छोटा पडदा आणि मोठा पडदा अशा तिन्ही ठिकाणी लीलया संचार करत मोहन जोशी यांनी त्यांच्या अभिनयाची वेगळीच छाप उमटवली आहे. केवळ मराठी व हिंदीच नव्हे तर या मराठी शिलेदाराने भोजपुरी आणि कन्नड चित्रपटांनाही गवसणी घातली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत खलनायक म्हणून ठसा उमटवणाऱ्या मोहन जोशी यांनी मायमराठीत मात्र त्यांच्या खास अभिनय शैलीतून रसिकांच्या गळ्यातला ताईत होण्याची भूमिका नेटाने बजावली आहे. त्यांच्या उमेदवारीच्या काळात ते या क्षेत्रापासून कोसो दूर होते. पण पोटापाण्यासाठी बरेच उद्योगधंदे केलेल्या या मेहनती माणसाचे चीज हे अभिनय क्षेत्रात व्हायचे होते, हे विधिलिखितच असावे. मोरूची मावशी या नाटकापासून सुरू झालेला त्यांचा अभिनय प्रवास आजही तितक्याच जोमाने सुरू आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी रावसाहेब या चित्रपटात भूमिका साकारत राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त केला. तेव्हापासूनचा हा प्रवास आता संगीत नाटक अकादमीपर्यंत येऊन पोहोचला आहे. घराबाहेर, सवत माझी लाडकी, तू तिथं मी अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी रसिकांवर गारुड केले. नॉट ओन्ली मिसेस राऊत या चित्रपटातली त्यांची भूमिकाही लक्षवेधी ठरली. मराठीत जम बसल्यावर त्यांना हिंदी चित्रपटसृष्टी खुणावू लागली आणि तिथेही त्यांनी मराठी अभिनयाचा अनोखा आविष्कार पेश केला. भूकंप, वास्तव, मृत्युदंड, गंगाजल अशा चित्रपटांतून विविध प्रकारच्या भूमिका रंगवत त्यांनी हिंदी चित्रशौकिनांच्या मनातही अढळ स्थान निर्माण केले. मराठी मालिकांमध्ये अनेकविध भूमिका साकारत मोहन जोशी यांचा अभिनय घराघरांत जाऊन पोहोचला. आजही तिन्ही क्षेत्रात त्यांची मुशाफिरी सुरू असताना अ. भा. मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून ते यशस्वी कामगिरी पार पाडत आहेत, हेसुद्धा त्यांच्या लौकिकास साजेसेच म्हणावे लागेल.