शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘निकाल स्वीकारा... पुढचा विचार करा’

By admin | Updated: May 29, 2016 03:29 IST

विद्यार्थ्यांनीही निकालाचा जास्त ताण घेऊ नये. जो निकाल लागेल त्याचा स्वीकार करावा. दहावीचा निकाल हा शेवटचा निकाल नसतो. यामध्ये अपयश आले तरीही खचून जाऊ नये.

- पूजा दामलेविद्यार्थ्यांनीही निकालाचा जास्त ताण घेऊ नये. जो निकाल लागेल त्याचा स्वीकार करावा. दहावीचा निकाल हा शेवटचा निकाल नसतो. यामध्ये अपयश आले तरीही खचून जाऊ नये. विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टी ठेवली पाहिजे. या काळात ताणतणावाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. या बाबी विद्यार्थी आणि पालकांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत. ताण कमी करण्यासाठी आवडत्या गोष्टी कराव्यात. या कालावधीत नातेसंबंधांवर परिणाम होणार नाही याची विशेष काळजी घेतली पाहिजे.

शाळेतील मुले परीक्षा देतात, परीक्षांचा निकाल येतो त्यानंतर ते पुढच्या इयत्तेत जातात. पहिली ते नववी इयत्तेत शिकताना विद्यार्थ्यांना परीक्षा आणि निकाल या दोन्ही गोष्टी चांगल्याच ओळखीच्या झालेल्या असतात. तरीही गेल्या काही वर्षांपासून दहावीचे प्रस्थ वाढले आहे. दहावी इयत्तेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘अधिक अभ्यास कर’, ‘नीट परीक्षा दे’ असे सतत सांगितले जाते. दहावीची परीक्षा म्हणजे वेगळी परीक्षा नाही. अन्य शालेय परीक्षांप्रमाणेच ही परीक्षा असते. यात एकच फरक असतो की, बोर्ड ही परीक्षा घेते. त्यामुळे याला महत्त्व असले तरीही ही परीक्षा म्हणजे अंतिम परीक्षा नाही, हे पालक आणि विद्यार्थ्यांनीही लक्षात ठेवले पाहिजे. वर्षभर केलेला अभ्यास, परीक्षेत लिहिलेले पेपर या दोन महत्त्वाच्या गोष्टींवर येणारा निकाल अवलंबून आहे. दहावीचा निकाल पुढच्या काहीच दिवसांत जाहीर होणार आहे. या निकालात मिळालेल्या यशावर कोणत्या महाविद्यालयात, कोणत्या शाखेत प्रवेश मिळणार हे अवलंबून असते. त्यामुळे चांगले गुण मिळावेत असे सर्वांनाच वाटत असते. पण प्रत्येकाला चांगले गुण मिळणे शक्य नाही. काहींना खूप चांगले, काहींना चांगले तर काहींना वाईट गुण मिळतात, तर काही मुले नापास होतात. पण जो काही निकाल लागेल तो स्वीकारणे अत्यंत आवश्यक आहे. जर निकाल स्वीकारलात तरच विद्यार्थी आणि पालक पुढचा रस्ता शोधू शकतात. त्यामुळे निकाल लागण्याआधी आणि लागल्यानंतरही डोके शांत ठेवणे गरजेचे असल्याचे मत समुपदेशक मुरलीधर मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडले. पालकांनी आपल्या पाल्याच्या बौद्धिक क्षमतेचा आणि आवडीचा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. पालकांनी आपल्या पाल्याची क्षमता ओळखणे आणि मान्य करण्याची गरज आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांनी कलमापन चाचणी दिलेली आहे. दहावीत एखादा विद्यार्थी नापास झाला तरीही त्याचे वर्ष फुकट जाणार नाही. कारण, जुलैमध्ये नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेत विद्यार्थ्यांना पास होण्याची संधी आहे आणि जरी जुलैच्या परीक्षेत विद्यार्थी नापास झाला तरीही तणाव घेण्याचे कारण नाही. नापास विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. वर्षभर हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यामुळे विद्यार्थ्यांचे हे वर्ष फुकट जाणार नाही. विद्यार्थी हा अभ्यासक्रम पूर्ण करताना दहावीचा अभ्यासही करू शकतात. विद्यार्थी नापास झाल्यास त्याच्या पालकांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. मुलांना खचू देऊ नये. त्यांना समजून घेऊन अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मोरे यांनी सांगितले.विद्यार्थ्यांनीही निकालाचा जास्त ताण घेऊ नये. जो निकाल लागेल त्याचा स्वीकार करा. दहावीचा निकाल हा शेवटचा निकाल नसतो. यामध्ये अपयश आले तरीही खचून जाऊ नये. विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टी ठेवली पाहिजे. या काळात ताणतणावाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. या बाबी विद्यार्थी आणि पालकांनी लक्षात ठेवल्या पाहिजेत. ताण कमी करण्यासाठी आवडत्या गोष्टी कराव्यात. या कालावधीत नातेसंबंधांवर परिणाम होणार नाही याची विशेष काळजी घेतली पाहिजे. पालक आणि पाल्यांमध्ये दुरावा निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. नातेवाईक, शेजारी काय म्हणतात, त्यांना काय वाटेल याकडे लक्ष देऊ नये. पालक आणि पाल्यांनी मिळून पुढच्या करिअरची वाट शोधणे आवश्यक आहे, असे समुपदेशक बी.के. हयाळीज यांनी सांगितले.