धुळे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी साक्री तालुक्यातील बारीपाडा येथे कार्यक्रमासाठी येणार असल्यामुळे पंचक्रोषीतून एकवटलेले ग्रामस्थ कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत थांबून होते़ कोश्यारी धुळ्याकडे रवाना झाल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी पुन्हा ग्रामस्थ एकत्र आले होते़ राज्यपालांना निरोप देण्यासाठी ग्रामस्थ एकवटले़ त्यामुळे प्रचंड गर्दी या ठिकाणी झाली होती़ लहान बालगोपालांनीही याठिकाणी आपली उपस्थिती दिली़ पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता़
राज्यपालांसाठी ग्रामस्थ एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 11:49 IST