लोकमत न्यूज नेटवर्कन्याहळोद : येथे अनेक विकास कामे मंजूर करण्यात आली होती . मात्र कोरोना बंद काळात ही कामे प्रलंबित होती. या कामांना सुरवात झाली असून कृषी सभापती यांच्या प्रयत्नातून पशु वैद्यकीय दवाखान्यासाठी २५ लाखांचा निधी मंजूर झाले आहेत.विविध विकास कामे अंतर्गत एक कोटी ९० लाख रुपये मंजूर झाले होते. यात सब स्टेशन येथे रस्ता काँक्रीटीकरण, कुंभार गल्ली रस्ता काँक्रीटीकरण, मंगल कार्यालय जवळ विविध उपयोगी शेड बांधणे ही कामे पूर्ण झाली आहेत. कोरोनामुळे जिरे गल्ली व सोसायटी आॅफिस, सिंडिकेट बँक येथील कामे प्रलंबित होती. कृषी सभापती रामकृष्ण खलाणे यांच्या प्रयत्नातून उर्वरीत कामे सुरू झाली आहेत . २५-१५ योजने अंतर्गत ही कामे होत असल्याचे गटनेते विकास पवार यांनी सांगितले.शेतकऱ्यांच्या पशुधन आरोग्यासाठी पशुवैद्यकीय दवाखाण्यासाठी कृषिसभापती खलाने यांनी २५ लक्ष रुपये मंजूर केले आहेत. यात पेव्हर ब्लॉक, छत दुरुस्ती, गुरांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र शेड करण्यात येणार आहे. या दवाखान्यात वीज जोडणी नसल्याने अनेक वर्षांपासून फ्रीज बंद आहे, यास सोलर फ्रीज मिळाल्यास विविध प्रकारच्या लस ठेवता येतील असे पशुवैद्यकीय कर्मचारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले.दरम्यान आज जिरे गल्ली येथे रस्ता काँक्रीटीकरण कामाची सुरुवात झाली असून ही कामे दजेर्दार करावीत अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या कामावर गट नेते विकास पवार, सरपंच ज्योती भिल, सदस्य कल्पेश रायते लक्ष ठेऊन आहेत. ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आहवान ग्रामपंचायतीने केले आहे .
न्याहळोद येथे विविध विकास कामे सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 21:57 IST