चंद्रकांत सोनार लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : दोन वर्षापूर्वी मनपा निवडणूकीत १५ सूत्रे विकासाची योजना भाजपाची या मुद्यावर निवडणूक लढविली होती. या विकास जाहीरनाम्यात धुळेकरांना दर्जदार रस्ते, खड्डेमुक्त शहर, मनपाची शहर बससेवा तसेच वाहतूकचा प्रश्न सोडविण्यासाठी उड्डान पुलानिमित्ती करणार असल्याचे आश्वासन सत्ताधारी पक्षाकडून देण्यात आली होती. महापालिकवर सत्तेत आल्यानंतर बोटावर मोजण्या इतके प्रश्न दाेन वर्षात सुटू शकले आहे. त्यामुळे आजही धुळेकर नागरिकांना प्रभागातील व शहरातील समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आतातरी सत्ताधारी पक्षाकडून धुळेकरांचे प्रश्न साेडविण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जाहीरनाम्यात आश्वासनेधुळे महापालिका हद्दतील सर्व रस्ते दर्जेदार व खड्डे मुक्त करणार.वाहतूक कोंडी होणार्या चौकात उड्डाणपूल उभारण्यासाठी राज्यशासनाकडे प्रस्ताव पाठवणार धुळे शहरातील अरूंद व रहदारीच्या रस्त्यांचे रूंदीकरण महापालिकेकडून केली जाणारशहरातील तसेच कॉलनी परिसरातील सर्व रस्त्यांवर पथदिवे बसविणारनागरिकांना चालण्यासाठी फुटपाथ बांधणार, स्वंतत्र सायकल ट्रॅकची निमि्ती केली जाणार शहरात सुनियोजित हॉकर्स धोरण राबवून रस्ते अतिक्रमणमुक्त करणार, पार्कीग झाेनचे कोटेकाेर पणे अंमलबजावणी केली जाणार धुळे महापालिकेची सिटी बस सेवा सुरू करणार, शहरात सुसज्य वाहनतळ उभारणार हरात नवीन ट्रान्सपोर्ट हब उभारणार, बंद पडलेले सिग्नल सुरू करणार असल्याचे आश्वासन मनपा निवडणूकीत दिले होते.
आश्वासनांची सद्यस्थितीशहरात माेजक्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र दोन वर्षात अद्याप पूर्ण झालेले नाही. तर आजही बर्याच ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. शहरात काही ठिकाणी कायम वाहतूकीची कोंडी होते. मात्र उड्डाणपूल उभारण्यासाठी कोणताही प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलेला नाही. शहरातील अनेक रस्त्यावर व्यवसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहतूकीला अडथडा होत असतांना मनपाकडून दुर्लक्ष केले जाते. एलएडी पथदिवे बसविण्याबाबत दोन वर्षापासून महासभेत चर्चा होत आहे. मात्र अद्याप प्रश्न मागी लागलेला नाही. त्यामुळे पथदिवे आजही बंद आहेत.नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथ किंवा स्वंतत्र सायकल ट्रॅकची निमि्ती चे आश्वासन दिले होते. मात्र स्थायी किंवा महासभेत हा विषय आलाच नाही.समविषम पार्किंगचे कोणतेही नियोजन नाही. त्यामुळे दुकानदार बेसमेंटच जागेचा उपयोग पार्किंग व व्यवसाय करतात, मात्र कारवाई होत नाही.सिग्नल व्यवस्था केवळ नावालाच आहे. मुख्य बाजार परिसरातील काही ठिकानी सिग्नल व्यवस्था सुरू आहे. तर शहरातील ८० टक्के सिग्नल आजही बंद अवस्थेत आहेत.