एसएसव्हीपीएस व महिला महाविद्यालयातील शिबिराचे उद्घाटन कंमाडिंग ऑफिसर कर्नल बी. व्ही. एस. शिवा राव यांचे हस्ते संपन्न झाले. या वार्षिक प्रशिक्षण शिबिरात एसएसव्ही पीएस, डॉ. पी. आर. घोगरे, झेड.बी.पाटील, महिला महाविद्यालय व जीईटी महाविद्यालय, नगाव येथील सिनियर डिव्हीजन व सिनियर विंगचे ३०२ छात्र सैनिक कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून प्रशिक्षण घेत आहेत. यशस्वीतेसाठी कर्नल बी.व्ही.एस.शिवा राव, जगमित सिंग, सुभेदार मेजर गुरमित सिंग, डॉ. मनोहर पाटील, डॉ. एम. व्ही पाटील यांचे मार्गदर्शनात कॅप्टन डॉ. के.जी. बोरसे, कॅप्टन के.एम.बोरसे, कॅप्टन डॉ. महेंद्रकुमार वाढे, कॅप्टन एस.के.चिमा, लेफ्टनंट डॉ. सुनिल पाटील, लेफ्टनंट पंकज देवरे, शशिकांत खलाणे, क्रांति पाटील, बीएचएम गजपति गावडे, हवालदार अशोक खरात, हवालदार मानसिंग, हवालदार प्रेमपाल, हवालदार रोशनलाल, हवालदार गोपाल खरात व भाग्यश्री पाटील परीश्रम करीत आहेत.
एनसीसीच्या ३०२ विद्यार्थांना प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:54 IST