शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

एकाच व्यक्तीकडून  देण्यात आली धमकी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 23:06 IST

सभापती सुनील बैसाणे यांची धक्कादायक माहिती

चंद्रकांत साेनार आठ महिन्याच्या सभापती पदाच्या कार्यकाळात जनमाणसात पक्षाचे प्रेम टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले करीत असतांना अनेक निर्णय घेतले. त्यातील काही विषय अनेकांना अडचणीत आणू शकतात. त्या विषयांवर मी वाचा फोडू नये, जनतेसमोर आणू नये, यासाठी पहिले निनामी पत्र त्या व्यक्तीने मला मनपात पाठविले होते. त्या पत्राकडे मी दुर्लक्ष केले. त्यांनतर माझ्या घरी आलेल्या पत्रात माझ्यासह माझ्या मुलास जीवेठार मारण्याची धमकी दिली होती. ते दोन्ही पत्र एकाच व्यक्तीकडून पाठविण्यात आल्याची धक्कादायक माहिती स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे यांनी दिली.प्रश्न : दोन्ही पत्रात काय नमुद केले होते? व कारण काय सांगू शकाल?उत्तर : तुम्ही जनतेच्या हितसाठी चांगले काम करीत आहात, मात्र ते काहींनी नको आहे,  त्यामुळे तुम्हाला काही अधिकारी, कर्मचारी तसेच राजकीय व्यक्ती कडून धोका आहे. तुम्हाला वेळीच सावध रहावे, असे पत्र हिंन्दी भाषेतून मनपात पाठविले होते. त्यांनतर दुसरे  पत्र मराठी भाषेतून टाईप करून माझ्या घरी पाठविण्यात आले.  दुसरे मराठी भाषेतील पत्रातील काही शब्द मराठी तर काही हिंदी आहे. वाचल्यावरून दोन्ही पत्र पाठविणारा एकच व्यक्ती असल्याचे समजते.प्रश्न : त्या  निनावी पत्राचा तुम्हाला कोणावर संशय आहे.उत्तर : पहिल्या पत्राकडे दुर्लक्ष केले म्हणून दुसरे पत्र माझ्या घरी पाठविण्यात आले. या पत्रात माझ्यासह मुलास मारण्याची धमकी अज्ञात व्यक्तीने दिली आहे. माझ्या परिवाराचा राजकारणाशी काहीही संबंध नसतांना केवळ काही अपवादात्मक विषयांकडे दुर्लक्ष करावे, सभेत केवळ विषयांना मंजूरी देेण्याचे काम करावे, यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. दोन्ही पत्र एकाचा व्यक्तीकडून देण्यात आले आहे. देणारा  जो कोणी आहे तो देखील जवळचा आहे. त्याने समोरासमोर येवून धमकी द्यावी, त्यासाठी मी समर्थ आहे.प्रश्न :  वाॅटर ग्रेसचा पुन्हा काम देण्याची नामुष्की मनपावर येण्याचे काय कारण?उत्तर :  वाॅटरग्रेसला कंपनीला माझा विराेध आहे. हा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला. त्यानंतर रिलायबल  ठेका देण्याचा निर्णय घेतला. या कंपनीने काम करू नये, यासाठी मनपाच्या एका अधिकारी व राजकीय व्यक्तीने नाशिक येथे ठेकेदारास धमकी दिली. त्यामुळे पुन्हा वाॅटरग्रेसला काम दिले.अन्यथा नगरसेवक पदाचा राजीनामा देऊसभापती पदाचा कार्यकाळात विविध विषयांना मंजूरी देऊन सर्व जाती धर्माचा विचार डोळ्यासमोरे ठेवून विषय मार्गी लावले. कोरोनामुळे आठ महिन्यात अपेक्षित कामे होऊ शकली नाही. वेळ वाढवून देण्याची मागणी भाजपाच्या नेत्याकडे केली आहे. यापुढे संधी दिल्यास लोकहिताचे कामे करून दाखवू तसे न झाल्यास स्वत:सभापतीपदासह नगरसेवक पदाचा राजीनामा देऊ.महानगरात १५४ भुखंड मनपा मालकीचे १५४ भुखंड करार तत्वावर देण्यात आले आहे. तर काहींनी आपल्या नावावर केले आहेत. अशी मालमत्ता शोधून ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कोट्यावधींची मालमत्ता पुन्हा मिळू शकते 

तो मुद्दा राज्यभर  गजला काॅंग्रेस भवनासाठी मनपाने जागा दिली आहे. तिची मुदत  संपल्याने ती जागा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला होता. विषय राज्यभर जागला, या साठी जरी विरोध होत असला तरी हालचाली सुरू आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे