धुळे : कोरोना नंतरच्या काळात चोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे समोर येत आहे. घटना घडत असल्यातरी तेवढ्या उघडकीस येतातच असे नाही. चोरट्यांना पकडत असताना त्यांच्याकडून शंभर टक्के वसूल करण्याचा प्रयत्न पोलिसांचा असतो. पण, काही घटना उघडकीस आल्यानंतर त्यांच्याकडून सर्व मुद्देमाल का मिळत नाही, तो मिळविण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न आहे.
गेल्या सहा महिन्यात रोज जिल्ह्यात कुठे ना कुठे चोरी, घरफोडीच्या घटना घडत आहेत. त्यातल्या त्यात जबरी चोरीच्या घटनांनी देखील आपली मान बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे. असे असताना त्यांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांना पेलावे लागत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपुर्वी डॉ. पल्लवी सापळे, डॉ. संजय जोशी यांच्या घरी चोरट्याने हातसफाई केल्यानंतर त्यांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलिसांनी ते पेलले देखील. त्यात बऱ्यापैकी मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
लूट लाखोंची
रोकडसह दागिने लंपास
हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीने हातसफाई केली. तिने यासाठी इतरांची मदत घेतली. शिताफिने काम करुन रोखडसह दागिने घेऊन पोबारा केला. पण, पोलिसांनी ही चोरी उघड करण्यासाठी कसोशिने प्रयत्न केले आणि गेलेल्या रकमेपैकी बरीचशी रक्कम देखील मिळवून दिली होती.
मोलकरणीने केली हातसफाई
देवपुरात डॉ. संजय जोशी यांच्या घरी देखील चोरी झाली होती. त्यात मोलकरणीचाच हात असल्याचे प्राथमिक तपासत समोर येत होते. पण, पुरावा नसल्याने तिच्यावर पाळत ठेवली. त्यातून एका संशयिताला जेरबंद करण्यात आले. त्याच्या चौकशीतून चोरट्याने दागिने आणि रोकड लांबविल्याची कबुली दिली. त्याच्यासह मोलकरणीला अटक करण्यात आली.
दुचाकीही पकडल्या
शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना अशा चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे होते. त्यामुळे इतर गुन्ह्यांप्रमाणे त्या घटनांचा तपास सुरु असताना गेल्याच आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखा, आझाद नगर पोलिसांसह मोहाडी पोलिसांनी, देवपूर पोलिसांनी, पिंपळनेर पोलिसांनी दुचाकी चोरट्यांना पकडण्यासाठी प्रयत्न केले.
चोरी आणि घरफोडीच्या घटना घडल्यानंतर गुन्ह्याची नोंद पोलीस दप्तरी करण्यात येते. घटना कुठे आणि कशी घडली आहे, याशिवाय काही धागेदोरे मिळतात का याचा बारकाईने अभ्यास केला जातो. जास्तीत जास्त गुन्हे उघड करण्याचा पोलिसांचा प्रयत्न असतो.
- चिन्मय पंडित, पोलीस अधीक्षक
हे पहा आकडे
जानेवारी : २६
फेब्रुवारी : ३२
मार्च : २४
एप्रिल : ३५
मे : ४०
जून : ३३
जुलै : ४०