धुळे : अफगाणिस्तान या देशावर तालिबानने अतिक्रमण केल्यानंतर तणाव वाढला आहे. तेथून भारतात येणाऱ्या सुकामेवा व इतर वस्तूंवर परिणाम झाला असून, ते महाग झाले आहेत.
भारतात प्रामुख्याने अमेरिका, ऑस्ट्रेलिया व अफगाणिस्तान येथून सुकामेवा दाखल होत असतो. यावर्षी अमेरिकेत सुकामेव्याचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे यापूर्वीच भाव वाढलेले होते. तसेच अफगाणिस्तानवर तालिबान या अतिरेकी संघटनेने ताबा मिळवल्यानंतर त्याठिकाणी अस्थिरता निर्माण झाली आहे. तेथून येणाऱ्या सुकामेव्याची आवक थांबली आहे. त्यामुळे आणखी भाववाढ होण्याची शक्यता आहे.
दोन आठवड्यांचाच स्टॉक शिल्लक
- भारतात प्रामुख्याने अमेरिका, ऑस्ट्रेलिया व अफगाणिस्थान या देशातून सुकामेव्याची आयात केली जाते.
- यावर्षी अमेरिकेतील सुकामेव्याचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे भाववाढ झाली होती.
- आधीच भाव जास्त झाल्याने विक्री घसरली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांनी जास्त स्टॉक भरलेला नव्हता.
दर पूर्ववत होणे कठीण
अफगाणिस्तान या देशातून येणार सुकामेवा पूर्णपणे थांबला आहे. तसेच पुढील काही महिने तेथील स्थिती स्थिर होईल असे वाटत नाही. त्यामुळे अफगाणिस्थान व इतर देशांचा व्यापार थांबू शकतो. तसेच सुकामेव्याचे उत्पादनही घटले असल्याने दर तत्काळ पूर्ववत होतील असे वाटत नाही.
- स्मिथ लोढा, व्यावसायिक
अफगाणिस्थानमध्ये निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे सुकामेव्याची आयात थांबली आहे. शाहजिरा, अंजीर व काळ्या मनुक्याचे भाव वाढलेले आहेत. सुकामेव्याची आवक वाढणार नाही तोपर्यंत भाव कमी होण्याची शक्यता नाही. भाव वाढल्याने ग्राहकही नाराजी व्यक्त करीत आहेत.
- राकेश कुंदन
हे पहा भाव (प्रति किलो)
पिस्ता
तणावापूर्वीचे भाव - ८१०
सध्याचे भाव -९६०
अंजीर - सॉल्टेड
तणावापूर्वीचे भाव - ५००
सध्याचे भाव - ७००
काळे मनुका -
तणावापूर्वीचे भाव - २४०
सध्याचे भाव - २७०
शाहजिरा
तणावापूर्वीचे भाव ८१०
सध्याचे भाव ९२०