सार्वे ग्रामपंचायत निवडणुकीत चक्रधर पॅनलविरुद्ध विकास पॅनल अशी लढत झाली. काँग्रेसप्रणित विकास पॅनेलच्या सात ही जागा निवडून आल्या. सरपंचपदी शरद पंडितराव भामरे (पाटील) यांची, तर पंडित संतोष भामरे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. कृउबा समितीचे संचालक शरद पाटील यांनी पुन्हा एकदा आपली सत्ता कायम ठेवली आहे. यावेळी पीठासीन अधिकारी एस.डी. शिंदे, ग्रामसेवक एस.एम. देवरे, तलाठी विजय सोनवणे यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. यावेळी स्मिता शरद पाटील, आशाबाई श्रीराम ईशी, विमलबाई अर्जुन मोरे, सायंकाबाई गोरख मोरे, रत्नाबाई हिंमत भामरे, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सरपंच व उपसरपंच घोषित झाल्यानंतर श्रीराम ईशी, नीळकंठ रघुवंशी, पोलीस पाटील वैशाली पाटील, चंद्रकांत पाटील, दत्तात्रेय मोरे, तुषार पाटील, रामकृष्ण पाटील, हिंमत पाटील, प्रदीप पाटील, माजी पोलीस पाटील पांडुरंग पाटील, आत्माराम पाटील, गणेश साळुंखे, भालेराव यादव पाटील, प्रसाद रघुवंशी, भगवान पाटील, रवींद्र बोरसे, दगडू पाटील, गुलाबराव पाटील, किसन पाटील, वसंत पाटील, मच्छिंद्र पाटील, वंजी पाटील, कैलास पाटील, जितेंद्र पाटील, दिलीप पवार, भूषण पवार, मांगू ठाकरे, जतन बागुल, अर्जुन मोरे, भटू परदेशी, भीमराव पाटील, लोटन पाटील, लक्ष्मण ईशी, गोकुळ पाटील, बाळकृष्ण पाटील आदींनी सत्कार केला.
सारवे सरपंचपदी शरद पाटील बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:42 IST