धुळे : स्थायी समिती सभापती पदासाठीची निवड प्रक्रियेला सुरुवात झाली. त्याअंतर्गत अर्जांच्या विक्रीला सुरुवात झाल्याने स्थायी समिती सभापती पदासाठी दोन अर्ज आणि महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी दोन अर्जांची विक्री करण्यात आली. एकानेही अर्ज दाखल केला नाही. अशी माहिती नगरसचिव मनोज वाघ यांनी दिली. दरम्यान, मंगळवारी दुपारपर्यंत शेवटची मुदत आहे.महापालिकच्या स्थायी समिती सभापती आणि महिला व बालकल्याण समिती सभापती पदाची मुदत संपुष्टात आली. परिणामी निवड प्रक्रिया करण्यासाठी अर्ज विक्री आणि दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी माजी स्थायी समिती सभापती तथा विद्यमान नगरसेवक संजय जाधव यांनी दोन अर्ज घेतले आहेत. दाखल मात्र केले नाही. तसेच महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी वंदना विक्रम थोरात यांनी दोन अर्ज खरेदी केले असून दाखल मात्र केलेले नााही.मंगळवार १६ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेपर्यंत अजार्ची खरेदी आणि दाखल करण्याची मुदत देण्यात आलेली आहे. परिणामी कोण अर्ज घेणार की हे घेतलेले अर्जच दाखल होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. दोन्ही पदासाठीची निवड प्रक्रिया गुरुवार १८ फेब्रुवारी रोजी राबविण्यात येणार आहेत.
स्थायी सभापतीसाठी दोन अर्जांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 22:40 IST