धुळे शहरातील एका माजी नगरसेवकाच्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. अंत्यसंस्कारासाठी व मयताच्या परिवारातील सदस्यांचे सात्वन करण्यासाठी अनेक राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते गेले होते.या मयताच्या परिवारातील सदस्यांसह अन्यजणांचे स्वॅब तपासणीसाठी भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले होते़ शनिवारी मयताची आई व पत्नीचे अहवाल निगेटिव्ह आला होता. तर रविवारी प्राप्त झालेल्या रिपोर्टनुसार त्याच्या परिवारातील सर्वच सदस्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती हिरे प्रयोग शाळेमार्फेत देण्यात आली़
माजी नगरसेवकाच्या परिवारातील सदस्यांचे अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 19:38 IST