लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : शहरातील कर्मवीर व्यंकटराव रणधीर सीबीएसई स्कूलमध्ये ३ दिवशीय हिवाळी शिबीरात तलवारबाजी प्रदर्शन घेण्यात आले़ त्यात आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून ते कसे हाताळाव्यात या संदर्भातल्या टिप्स दिल्यात़३ दिवशीय हिवाळी शिबीराचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन डॉ़तुषार रंधे यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी संस्थेचे सचिव निशांत रंधे, कार्याध्यक्षा आशाताई रंधे, ट्रस्टी संजय गुजर, शामकांत पाटील, डॉ़एस़एऩपटेल, प्राचार्या प्रसन्ना मोहन, निलेश सोनार आदी उपस्थित होते़ तलाबारी स्पर्धेचे ज्ञान शाळेतील मुलांना आत्मसात करण्यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आले़ आंतरराष्ट्रीय खेळाडू ललित किशोरसिंग गिरासे, राष्ट्रीयस्तरावरील खेळाडू माधुरी भरत भदाणे, राज्य पातळीवरील खेळाडू हर्षल शशिकांत बोरगावकर, रोहित चतुरसिंग राजपूत, हर्षल गिरधर सुर्यवंशी यांनी तलवार बाजी कसे खेळावे याच्या टिप्स देवून प्रात्यक्षिक करून दाखविलेत़ या शिबीरात शाळेतील सर्वच विद्यार्थी सहभागी झाले होते़ खेळाडूंना प्रोत्साहन करण्यासाठी प्राचार्या प्रसन्ना मोहन यांनी देखील मार्गदर्शन केले़
रणधीर सीबीएसईला तलवारबाजी प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 18:11 IST