तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रक्रियेत ६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित २८ ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात आले होते. त्याचा निकाल १८ जानेवारी रोजी जाहीर झाला़ दरम्यान, तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली़
सुरुवातीला अनुसूचित जातीचे आरक्षण काढल्यानंतर अनुसूचित जमाती, ओबीसी व शेवटी सर्वसाधारण जागेचे आरक्षण काढण्यात आले़ नम्रता युवराज कोळी या बालिकेने आरक्षित जागेची सोडत काढली़
अनुुसूचित जाती आरक्षण
सन २०१८ च्या जनगणनेनुसार गावाच्या लोकसंख्येनुसार सर्वात जास्त टक्केवारी असलेल्या जमातीचे आरक्षण काढण्यात आले़ त्याप्रमाणे एससी सरपंच जागेसाठी टेकवाडे, रूदावली, भोरटेक, ताजपुरी व होळ या ५ गावांची सोडत काढण्यात आली़
अनुसूचित जमाती आरक्षण
या गटात हिंगोणी बु़, गरताड, कळमसरे, आमोदा, जापोरा, अजंदे बु़, भोरखेडा, पाथर्डे खर्दे खुर्द, वनावल, तरडी, करवंद, टेंभे, जुने भामपूर, बाळदे, मांजरोद असे १५ गावांचे आरक्षण अनुसूचित जमातीकरिता काढण्यात आले़
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
या प्रवर्गात गिधाडे, भाटपुरा, घोडसगाव, पिळोदा, बभळाज, विखरण, चांदपुरी, वाठोडा, मांडळ, असली तांडे, कुरखळी, सुभाषनगर, आढे, सावळदे, जातोडा, अहिल्यापूर, नवे भामपूर, भटाणे अशी १८ ग्रामपंचायतींची सोडत ओबीसी प्रवर्गासाठी काढण्यात आली़
सर्वसाधारण प्रवर्ग
सर्वसाधारण प्रवर्गासाठी अजनाड, पिंप्री, त-हाडी, नांथे, उप्परपिंड, बलकुवे मुखेड, कुवे, वरूळ, भरवाडे, बोरगाव, शिंगावे, खर्दे बु़, थाळनेर, तोंदे, सावेर गोदी, अंतुर्ली, साकवद, जवखेडा, खामखेडा, दहिवद, उंटावद, जैतपूर, वाघाडी, लोंढरे, अर्थे बु़, अंजदे खुर्द, भावेर, पिंपळे, बाभुळदे, अर्थे खुर्द अशा ३० ग्रामपंचायतींसाठी खुल्या जागेसाठी आरक्षित करण्यात आले आहे.
५० टक्के आरक्षण
अनुसूचित जाती ५, अनुसूचित जमाती १५, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग १८ तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३० असे ६८ ग्रामपंचायतींचे सरपंचपदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले असून त्यामध्ये ५० टक्के महिला आरक्षण असणार आहे़
१ रोजी महिला सरपंचपदाचे आरक्षण सोडत
तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांसाठी १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता येथील तहसील कार्यालयाच्या हॉलमध्ये प्रवर्गनिहाय सरपंचपदाचे आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे़ त्यामध्ये अनुसूचित जाती ५, अनुसूचित जमाती १५, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग १८ तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी ३० असे ६८ ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे़ प्रत्येक विभागात ५० टक्के याप्रमाणे महिला सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात येणार आहे़
पेसाअंतर्गत ग्रामपंचायती
तालुक्यातील ११८ पैकी ५० ग्रामपंचायती पेसाअंतर्गत समावेश झाल्याने अनुसूचित क्षेत्रात असल्यामुळे अनुसूचित जमातीकरिता राखीव करण्यात आल्या आहेत़ त्यात नटवाडे, चाकडू, शेमल्या, हिंगोणीपाडा, जामण्यापाडा, लाकड्या हनुमान, न्यू बोराडी, रोहिणी, चिलारे, दुर्बड्या, भोईटी, गधडदेव, बुडकी, हिगाव, पनाखेड, मालकातर, हातेड, पळासनेर, हेंद्र्यापाडा, कोडीद, बोरपाणी, सांगवी, निमझरी, लौकी, खामखेडा, आंबे, जोयदा, वकवाड, नांदर्डे, चांदसे, जळोद, मोहिदा, झेंडेअंजन, हिवरखेडा, गुºहाळपाणी, सुळे, खैरकुटी, फत्तेपूर फॉरेस्ट, खंबाळे, महादेव दोंदवाडे, वरझडी, त-हाडकसबे, हाडाखेड, हिसाळे, बोराडी, वाडी खुर्द, उर्मदा, टेंभेपाडा, वाडी बु़, वासर्डी असे ५० ग्रामपंचायती पेसाअंतर्गत असल्यामुळे त्या राखीव आहेत़
शासनाकडून असा भेदभाव का?
या महिन्याच्या तिस-या आठवड्यात झालेल्या ३४ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर करण्यात आले़ मात्र, सन २०२१ ते २०२५ या कालावधीत मुदत संपणा-या ग्रामपंचायतींचेदेखील आजच सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात आले़ हे सर्वसामान्य जनतेला न उलगडणारे कोडे आहे़ केवळ ३४ ग्रामपंचायतींसाठी का मतमोजणीनंतर सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात आले, असा प्रश्न अनुत्तरीत आहे़ भविष्यात होणा-या ग्रामपंचायतींचे मग आजच का आरक्षण काढण्यात आले, असेही विचारले जात आहे़ असा भेदभाव कशासाठी, असा प्रश्न जनता आता विचारू लागली आहे़