शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
3
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
4
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
5
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
6
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
7
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
8
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
9
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
10
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
11
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
12
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
13
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
14
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
15
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
16
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
17
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
18
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
19
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
20
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन

हॉटेलमध्ये दारु पिण्यास मनाई, वेटरला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 22:42 IST

आठ जणांना अटक, तणावाचे होते वातावरण

पिंपळनेर : जेवणासाठी हॉटेलमध्ये आलेल्यांना दारु पिण्यास मनाई केली म्हणून त्यातील एकाने वेटरवर चाकू हल्याचा प्रयत्न केला. तर, इतरांनी दोघांना मारहाण केल्याने हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत जावून पोहचले. याप्रकरणी ८ जणांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली. १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी उशिरा पिंपळनेरनजिक मैंदाणे शिवारात हॉटेल श्री बालाजी येथे आठ जणं जेवणासाठी आले होते. जेवण तयार होत असताना त्यांनी सोबत आणलेली दारु पित असल्याने वेटर रतन वैष्णव याने त्यांना मनाई केली. यावेळी राग येवून त्यातील जयेश बागूल याने किचनमधील चाकू आणून रतनवर वार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दिनेश वैष्णव त्याच्या मदतीला धावून आला. शिवाय हॉटेलचे मालक सावरलाल घनश्याम वैष्णवा हे देखील पोहचले. मात्र, हा संतप्त समुदाय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. श्रीराम बागुल याने टेबलची फळी उचलून ती थेट मालकाच्या पाठीत टाकल्याने सावरलाल वैष्णवा हे जखमी झाले.याप्रकरणी १५नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल होताच याप्रकरणाचे तपासी अंमलदार पोलीस कर्मचारी सोनवणे यांनी तपासाची दिशा फिरवली. या घटनेतील सचिन धनाजी अहिरे (३१, रा. पहुबारा), विजय वसंत अहिरे (३२, रा. पहुबारा), राकेश अशोक पवार (५५, रा. मावचीपाडा), भाऊसाहेब भाईदास सूर्यवंशी (२२, रा. बोधगाव), जयेश लक्ष्मण बागूल (२१, रा. पहुबारा), सागर छोटीराम ठाकरे (२१, रा. बोधगाव), लखन गोविंदा बळीराम (२४, रा. बोधगाव), श्रीराम पंडीत बागूल (२३, रा. बोधगाव) यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

टॅग्स :Dhuleधुळे