शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!
5
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
6
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
7
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
8
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
9
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
10
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
11
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
12
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
13
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
14
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
15
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
16
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
17
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
18
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
19
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
20
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!

कारमधून वाहून नेला जाणारा गांजा मोहाडी पोलिसांनी पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 22:09 IST

अवधान शिवारातील कारवाई, दोघांना केली अटक

धुळे : मुंबई-आग्रा महामार्गावरून एका कारमध्ये गांजा वाहून नेला जात असल्याची माहिती मोहाडी पोलिसांना मिळताच सापळा लावून कार थांबविण्यात आली. कारची तपासणी केली असता त्यात ४० हजार रुपये किमतीचा गांजा आढळून आला. अवधान शिवारात रविवारी दुपारी ही कारवाई केली असून दोघांना अटक केली आहे.शिरपूरकडून मालेगावच्या दिशेने एक कार जात असून त्यात गांजा लपविण्यात आला आहे, अशी माहिती मोहाडी पोलीस ठाण्याचे साहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांना मिळाली. माहिती मिळताच मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर अवधान शिवारात मोहाडी पोलिसांनी रविवारी दुपारी सापळा लावला. त्याचवेळेस सदगुरू प्लायवूड अ‍ॅण्ड डोअर हाउससमोरून जाणारी एमएच ०५ बीजे ३१९० क्रमांकाची कार अडविण्यात आली. चालकाकडे विचारणा केल्यावर उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने कार बाजूला घेऊन त्याची तपासणी करण्यात आली. पिवळ्या रंगाच्या थैलीत चार प्लॅस्टिकच्या पिशवीत १० किलो १६१ ग्रॅम वजनाचा सुका हिरवट रंगाच्या भुग्यासह उग्र वासाचा गांजा आढळून आला. ४ हजार रुपये किलोप्रमाणे ४० हजार ६४४ रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला.या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रभाकर ब्राह्मणे यांनी ३ जानेवारी रोजी रात्री सव्वानऊ वाजता फिर्याद दाखल केली. त्यानुसार, कारचालक इरफान युसुफ अन्सारी (३७) आणि मोहम्मद रेहान मो. हानिफ कुरेशी (१९) (दोन्ही रा. अंधेरी पश्चिम, मुंबई) या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा करीत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु, मुस्तफा मिर्झा, राजेंद्र मराठे, प्रभाकर ब्राह्मणे, शाम निकम, गणेश भामरे, जितेंद्र वाघ, सचिन वाघ, अजय दाभाडे, धिरज गवते, कांतीलाल शिरसाठ यांनी कारवाई केली़

टॅग्स :Dhuleधुळे