धुळे : धुळे तालुक्यातील वडजाई येथील ग्राम पंचायतीची पचवार्षिक निवडणुकीनिमित्ताने १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे़ मतदान प्रक्रियेला कुठलेही गालबाट न लागता शांततेत पार पाडावी यासाठी मोहाडी पोलिसांकडुन शुक्रवारी रात्री आठ वाजता शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली़ग्रामपचायत निवडणुकीच्या रिगणात असलेले उमेदवार, पॅनल प्रमुख व गावातील ग्रामस्थांची बैठक गावाबाहेरील मारोती मंदिरांवर आयोजित करण्यात आली होती़ मोहाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक योगेश राजगुरु यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली़ यावेळी ग्रामस्थांना योगेश राजगुरु यांनी मार्गदर्शन केले़ निवडणुक प्रक्रिया शांततेत पार पाडावी, कुठेही गालबोट लागता कामा नये, सोशल मिडियावर कुठलेही आशेपार्ह पोस्ट टाकूनये. निवडणुकीतील अपप्रचार टाळावा त्यामुळे वाद निर्माण होतात ते टळावे. यावेळी ग्रामस्थांनीही काही प्रश्न उपस्थित केले़ त्या प्रश्नांचे समाधानकारक उतरे योगेश राजगुरू यांनी दिल्याने गावकऱ्यांचे समाधान झाले. यावेळी वडजाई परिसराचे बीट हवालदार तुषार जाधव, गणेश भामरेसह गावातील उमेदवार व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वडजाईत शांतता समितीची मोहाडी पोलिसांकडून बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 22:30 IST