निमगूळ-बाबरे रस्ता दुरूस्त करावा
विंचूर : धुळे तालुक्यातील निमगूळ ते बाबरे या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. या रस्त्यावरून वाहननेतांना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. हा रस्ता त्वरित दुरूस्त करावा अशी मागणी होत आहे.
डाॅ. संजय सोनवणे यांची निवड
साक्री : सी.गो.पाटील महाविद्यालयतील सेवानिवृत्त प्राध्यापक डाॅ. संजय सोनवणे यांची राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पदवीधर संघाच्या जळगाव लोकसभा मतदार संघाच्या कार्याध्यक्षपदी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नियुक्ती केली आहे.
एकलव्य समाजसुधारक पुरस्कार वितरण
धुळे : महाराष्ट्र राज्य अकादमी व एकलव्य आदिवासी सेवा समितीतर्फे वीर एकलव्य समाजसेवक पुरस्कार वितरण सोहळा २२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता सानेगुरूजी ज्येष्ठ नागरिक संघ, फाशीपूल रोड धुळे येथे होणार आहे. उपस्थितीचे आवाहन आयोजकांनी केले आहे
मोफत मास्कचे केले वाटप
धुळे : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी आमदार कुणाल पाटील यांची निवड झाल्यानिमित्त काॅंग्रेस भवनात सत्कार करण्यात आला. यावेळी काॅंग्रेसचे उपाध्यक्ष मुकुंद कोळवले यांनी एक हजार मास्कचे मोफत वाटप केले.
बसपोर्टचा प्रश्न मार्गी लावण्याची गरज
धुळे : येथील बसस्थानकात येणाऱ्या गाड्या व प्रवाशांची संख्या लक्षात घेता, बसस्थानकाचा आवारा अपूर्ण पडत असतो. धुळे बसपार्टचा प्रश्न अनेक वर्षांपासून लालफितीत बंद असून, हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत.
कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी
धुळे : शहरात कचरा टाकण्यासाठी ठिकठिकाणी कुंड्या ठेवण्यात आलेल्या आहे. तसेच घराघरातील कचरा संकलित करण्यासाठी घंटागाड्या सुरू केलेल्या आहेत. असे असतानाही काहीजण रस्त्यावरच कचरा टाकत असतात. अशावर कारवाई करावी.
चाळीसगाव चौफुलीवर उड्डाणपूल बांधावा
धुळे : शहरातील चाळीसगाव चौफुलीवर नेहमीच वाहनांची गर्दी असते. अशा ठिकाणाहून वाहने नेतांना चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. वाहतूककोंडीची समस्या सुटण्यासाठी या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याची गरज आहे.
नदीपात्र स्वच्छ होत असल्याने समाधान
धुळे : शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या पांझरा नदीच्य पात्रात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला होता. गेल्या दोन दिवसांपासून नदीपात्रात स्वच्छता मोहीम सुरू असल्याने पर्यावरणप्रेमींनी समाधान व्यक्त केले असून ही मोहीम सतत सुरू ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली.