धुळे : कोरोना योध्दांचा सन्मान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते महापालिकेत करण्यात येत आहे़ यात सर्वात प्रथम वैद्यकीय सेवेला प्राधान्य देण्यात आले आहे़ याशिवाय कोरोनाच्या लॉकडाऊन काळात धुळ्यातील अग्रवाल भवनात स्थलांतरीत नागरीक, मजुरांना जेवणाची, राहण्याची व्यवस्था केल्याबद्दल विनोद मित्तल यांचा देखील सन्मान करण्यात आला़ डॉ़ चुडामण पाटील यांचे वडील पुंडलिक पाटील, अतिरिक्त आयुक्त गणेश गिरी, उपायुक्त शांताराम गोसावी, लेखा परिक्षक दिपकांत वाघ, सहायक आरोग्य अधिकारी चंद्रकांत जाधव, अजमेरा कॉलेजचे चेअरमन आशिष अजमेरा यांच्यासह अन्य कोरोना योध्दांचा सन्मान करण्यात आला़
राज्यपालांच्या हस्ते कोरोना योध्दांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 12:43 IST