शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

धुळे जिल्ह्यात एक लाख ३५ हजार मतदार वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 22:10 IST

विधानसभा निवडणूक : एक हजार ६९५ केंद्रांवर होणार मतदान

धुळे - विधानसभा निवडणुकीसाठी ३१ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदारयादीनुसार जिल्ह्यात मतदारांची संख्या १६ लाख ७९ हजार ९४२ एवढी आहे. तर २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी मतदारांची संख्या १५ लाख ४४ हजार ६९५ एवढी होती. यानुसार गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील मतदारांच्या संख्येत एक लाख ३५ हजार २४७ नी भर पडली.जिल्ह्यात यावेळी पुरूष मतदार ८ लाख ६६ हजार ८४९ तर स्त्री मतदारांची संख्या ८ लाख १३ हजार ६६ एवढी आहे. तृतीयपंथी मतदार २७ आहेत. असे एकूण १६ लाख ७९ हजार ९४२ मतदार आहेत. मतदार नोंदणी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसापर्यंत सुरू राहणार असल्याने मतदारसंख्येत अजून भर पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.साक्री विधानसभा मतदारसंघात ३ लाख ४२ हजार ३२४ मतदार असून त्यात पुरूष मतदार १ लाख ७६ हजार ३१० तर स्त्री मतदार १ लाख ६६ हजार ४ एवढी असून तृतीयपंथी मतदार १० आहेत. चार महिन्यापूर्वी या मतदारसंघात ३ लाख ३८ हजार ६८६ मतदार होते.धुळे ग्रामीण मतदारसंघात ३ लाख ७१ हजार ७४१ मतदार असून त्यात पुरुष मतदार १ लाख ९३ हजार १४० तर स्त्री मतदार १ लाख ७८ हजर ६०० एवढी असून तृतीयपंथी मतदार एक आहे. चार महिन्यांपूर्वी या मतदारसंघात ३ लाख ६९ हजार १२३ मतदार होते.धुळे शहर मतदारसंघात ३ लाख २० हजार ११७ मतदार असून त्यात पुरुष मतदार १ लाख ६८ हजार ३४३ तर स्त्री मतदार १ लाख ५१ हजार ७५८ एवढी असून तृतीयपंथी मतदार १६ आहेत. चार महिन्यांपूर्वी या मतदारसंघात ३ लाख १५ हजार ७२८ मतदार होते.शिंदखेडा मतदारसंघात ३ लाख २६ हजार ३३ मतदार असून त्यात पुरुष मतदार १ लाख ६५ हजार ९६४ तर स्त्री मतदार १ लाख ६० हजार ६९ एवढ्या आहेत. चार महिन्यांपूर्वी या मतदारसंघात ३ लाख २३ हजार ७१७ मतदार होते.शिरपूर मतदारसंघात ३ लाख १९ हजार ७२७ मतदार असून त्यात पुरुष मतदार १ लाख ६३ हजार ९२ तर स्त्री मतदार १ लाख ५६ जहार ६३५ एवढ्या आहेत. चार महिन्यांपूर्वी या मतदारसंघात ३ लाख १६ हजार ९७३ मतदार होते.निवडणूक अधिकारी नियुक्त, प्रत्येकी तीन सहायक अधिकारीजिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघ असून त्यासाठी निवडणूक अधिकारी व त्यांना प्रत्येकी तीन सहायक निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यात तीन उपजिल्हाधिकारी व दोन उपविभागीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.साक्री (०५) विधानसभा मतदारसंघासाठी उपजिल्हाधिकारी (रोहयो) गोविंद दाणेज हे निवडणूक अधिकारी राहतील. तर तहसीलदार साक्री, अपर तहसीलदार पिंपळनेर व मुख्याधिकारी नगरपंचायत साक्री हे सहायक निवडणूक अधिकारी असतील. धुळे ग्रामीण (०६) विधानसभा मतदारसंघासाठी उपविभागीय अधिकारी भिमराज दराडे, धुळे भाग धुळे हे निवडणूक अधिकारी राहतील. तर तहसीलदार धुळे ग्रामीण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, जि.प. व सहायक कार्यकारी अभियंता, सुलवाडे-जामफळ उपसा सिंचन योजना धुळे हे सहायक निवडणूक अधिकारी असतील.धुळे शहर (०७) विधानसभा मतदारसंघासाठी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. १) श्रीकुमार चिंचकर हे निवडणूक अधिकारी राहतील. तर अपर तहसीलदार, धुळे शहर, उपायुक्त, महापालिका धुळे व शिक्षणाधिकारी माध्यमिक, जि.प. धुळे हे सहायक निवडणूक अधिकारी असतील. शिंदखेडा (०८) विधानसभा मतदारसंघासाठी उपजिल्हाधिकारी (मपाप्र) सुरेखा चव्हाण या निवडणूक अधिकारी राहतील. तर तहसीलदार शिंदखेडा, अपर तहसीलदार, दोंडाईचा व उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालविकास विभाग, जि.प. हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असतील.शिरपूर (०९) विधानसभा मतदारसंघासाठी उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल, शिरपूर भाग, शिरपूर हे निवडणूक अधिकारी राहतील. तर तहसीलदार शिरपूर, मुख्याधिकारी, नगरपरिषद शिरपूर व गटविकास अधिकारी, शिरपूर हे सहायक निवडणूक अधिकारी असतील.