दुभाजकांना रंग देण्याचे काम सुरु
धुळे : शहरात देवपूर भागात नेहरु चौक ते नगावबारी रस्त्याच्या दुभाजकांना रंग देण्याचे काम सुरु आहे. याच रस्त्यावर भूमिगत गटारीचे काम सुरु आहे. एकूणच एकीकडे भूमिगत गटारीसाठी रस्त्याचे खोदकाम सुरु आहे. यामुळे माती उडून दुभाजकाचे रंग पुन्हा खराब होऊ शकते. त्यामुळे भूमिगत गटारीचे काम झाल्यानंतर जेव्हा रस्त्याचे डांबरीकरण होईल. त्यानंतर जर दुभाजकाला रंग देण्याचे काम केले तर ते चांगले होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. तरी संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा आहे.
मिल परिसरात व्हायफाय सुरु करावी
धुळे : शहरातील देवपूर, साक्री रोड, अग्रवाल नगर भागात बीएसएनएल आणि कंपनीचे टाॅवर आणि केबल असल्यामुळे या भागात व्हायफाय सेवा सुरु आहे. त्यामुळे या भागातील लोकांना मोबाईल आणि इंटरनेट सर्व्हिस चांगली मिळते. मात्र शहरात मिल परिसर, शासकीय दूध डेअरी परिसर, भाईजी नगर या भागात बीएसएनएल आणि अन्य खासगी कंपनीची केबल गेली नसल्यामुळे या भागात मोबाईल सेवा विस्कळीत आहे. तसेच इंटरनेट व्हायफाय कनेक्शनसुद्धा मिळत नसल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे.