धुुळे : कोरोनामुळे आठ महिन्यांपासून बंद असलेली मंदिरासह विविध धर्मियांचे प्रार्थनास्थळे सोमवारी खुली झाली आहे. त्यानंतर पहिल्या मंगळवारी कुलस्वामिनी श्री एकवीरा देवी मंदिरात सकाळी १० वाजता भाविकांच्या उपस्थित देवीची महाआरती झाली.मार्च महिन्यापासून मंदिरांसह सर्वच प्रार्थनास्थळे बंद करण्यात आलेली होती. जून महिन्यापासून सर्व व्यवहार हळूहळू पूर्वपदावर आल्यानंतर राज्यसरकारने पाडव्याच्या मुहूर्तावर सर्व प्रार्थनास्थळे सुरू केल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे.असे आहेत नियमधार्मिक स्थळे व पूजा करण्याची ठिकाणे नागरिकांसाठी सुरु करण्यात आली आहेत. मात्र, धार्मिक स्थळ उघडण्याची वेळ निश्चित करणे, तेथे थर्मल स्क्रीनिंग, हँड वॉश किंवा सॅनिटायझर उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित संस्थानचे विश्वस्त मंडळ, बोर्ड, प्राधिकारी यांच्यावर टाकण्यात आली आहे. या ठिकाणी नागरिकांना चेहऱ्यावर मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक राहील. ६५ वर्षापेक्षा जास्त वयाची व्यक्ती, दुर्धर आजार असलेले व्यक्ती, गर्भवती महिला व १० वर्षाखालील बालकांना मंदिरात आणू नये, अशा सुचना करण्यात आल्या आहेत. धार्मिक स्थळे व पूजा करण्याच्या ठिकाणी जाताना नागरिकांनी पुढील सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील. त्यात दर्शनासाठी आलेल्या नागरिकांनी एकमेकांमध्ये ६ फूट अंतर ठेवणे आवश्यक राहील. चेहऱ्यावर मास्कचा वापर करणे अनिवार्य राहील.अशी व्यवस्स्था करावीधार्मिक स्थळांच्या ठिकाणी संबंधित संस्थानचे विश्वस्त मंडळ, बोर्ड, प्राधिकारी यांनी पुढील सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहील. त्यात प्रवेशाच्या ठिकाणी हात धुण्याची व्यवस्था व हँड सॅनेटायझर, थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करावी. चेहऱ्यावर मास्क परिधान केलेल्या व्यक्तींनाच प्रवेश द्यावा. या ठिकाणी दैनंदिन कोविड-19 विषाणू बाबत जनजागृती करावी. त्यासाठी पोस्टर क्लीपचा वापर करावा. या ठिकाणी भेट देणाऱ्या अभ्यागतांची गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. गाभारा, आवार, व्हेन्टिलेशन आदी बाबी लक्षात घेऊन कमीत कमी नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन वेळ निश्चित करुन द्यावी.स्वत:च्या चटईचा वापर करावा.विषाणूचा संसर्ग, धोका लक्षात घेवून रेकॉर्ड केलेली धार्मिक गाणी, संगीताचा वापर करावा. चर्चमधील गायनस्थळ किंवा गायन गटास बंदी राहील. अभिवादन करताना एकमेकांचा शारीरिक संपर्क टाळावा. चटईचा वारंवार वापर करू नये.प्रार्थनेसाठी येताना संबंधितांनी स्वत:च्या चटईचा वापर करावा. पूजा करण्याची ठिकाणे व धार्मिक स्थळांमध्ये प्रसाद वाटप करणे, पवित्र पाणी देणे, शिंपडणे आदींचे वाटप करण्यास मुभा राहील. परंतु, अर्पण करण्यास बंदी राहील. सामूहिक किचन, लंगर्स, अन्नदान आदींना शारीरिक अंतर ठेवून वाटपाची मुभा असेल. संशयित, बाधित रुग्ण आढळून आल्यास पुढील प्रमाणे कार्यवाही करावी.अन्यथा कारवाई-कोरोना विषाणूच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत राज्य शासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, निर्देश, नियमावलीनुसार या कार्यालयाकडून वेळोवेळी निर्गमित केलेले सर्व आदेश लागू राहतील.या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ५१ ते ६० तरतुदीनुसार शिक्षेस संबंधित पात्र राहील. भाविकांनी नियमांचे पालन करावे असेही आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी म्हटले आहे. दरम्यान मंगळवारी सर्वच मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी दिसून आली.
आठ महिन्यानंतर भाविक ह्य नतमस्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 22:08 IST