धुळे : दसरा सणाच्यावेळी सोन्याचे भाव अधिक असल्याने अनेकांनी खेरदीकडे पाठ फिरवली होती. मात्र धनत्रोयादशीच्या दिवशी सोन्याचे भाव घसरल्याने ग्राहकांनी खरेदीला प्राधान्य दिले. त्यामुळे दिवसभर धुळ्यातील सराफ बाजरात झळाळी निर्माण झालेली होती. कोरोना संसर्ग काळापूर्वी सोन्याचे भाव तीन ते साडेतीन हजार होते. मात्र लाॅकडाऊननंतर सोन्याचे भाव पाच ते सहा हजारांपर्यत पोहचले आहे. गेल्या एक ते सव्वा महिन्यापासून सोने व चांदीचे दर स्थिर आहे. त्यामुळे ग्राहकांना दसऱ्याचा मुहूर्त साधता येऊ शकला नाही. त्यामुळे अनेकांनी धनत्रयाेदशीच्या मुहूर्तावर सोने खरेदी केली आहे. दागिन्यांची बुकिंग-लाॅकडाऊनच्या तीन महिन्यांच्या काळात नागरिक घरात राहून कंटाळले होते. त्यामुळे दिवाळीचे मुहूर्त साधत साेने खरेदी करीत आहे. गतवर्षी सोन्याचे भाव ३३ते ३५ हजार रुपये प्रती तोळा होते. यंदा ५२हजार रुपयांपर्यत पोहचले आहे. कोरोनामुळे काहीना आथिर्क अडचण असली तरी काही ग्राहक यथाशक्ती खरेदी करीत आहे. त्यामुळे कोरोना एवढा परिणाम बाजारपेठेत जाणवत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. काही ग्राहक विनामास्क सोने खरेदीला येत असल्याने ग्राहकांना दुकानात येण्याआधी मास्क व सॅनिटराझर दिले जात होते.
दसरानंतर साधला ग्राहकांनी सोने खरेदीचा मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 22:26 IST