शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

जिल्ह्यातील उद्योग, व्यवसायाला २५ कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 12:48 IST

लॉकडाऊन : अनेक उद्योग, व्यापार बंद पडण्याचा मार्गावर, राज्यशासनाकडून उद्योगांना उभारी देण्याची गरज

ठळक मुद्देअन्यथा पुन्हा लॉकडाऊनकाय सुरू?काय बंद?महागाई वाढली का?नागरिकांनी खबरदारी घ्यावी

चंद्रकांत सोनार ।लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात अडीच महिन्यासाठी लॉकडाऊन घोषीत करण्यात आले होते़ या अडीच महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील उद्योग, व्यापारावर मोठा परिणाम झाला असून सुमारे २५ कोटी रूपयांचा फटका उद्योजकांना सहन करावा लागला आहे़जिल्ह्यात नरडाणा व अवधान या दोन ठिकाणी औद्यागिक वसाहती आहेत़ त्यात २८० उद्योग आहेत. या उद्योगाचा विस्तार देशभरात आहे़ राजस्थान, बिहार, उत्तरप्रदेश, महाराष्ट्रासह खान्देशातील हजारो कामगारांची उदरनिर्वाह या उद्योगावर अवलंबून आहे़ २४ मार्च रोजी शासनाने लॉकडाऊन जाहीर केल्याने अनेकांना उद्योग, व्यापार तसेच लहान मोठे व्यवसाय तब्बल अडीच ते तीन महिने बंद होते. त्यामुळे याठिकाणी कामासाठी आलेल्या जिल्ह्यासह परराज्यातील कामगारांना आपल्या मायदेशी परत जावे लागले़ त्यामुळे ३० ते ३५ हजार कामगारांवर बेरोजगारी कुºहाड पडली आहे़ तीन महिन्यापासून ठप्प उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी थकीत विजबील, कामगारांचा पगार, जीएसटीची रक्कम, जागेचे भाडे, मशीन दुरूस्तीचा खर्च, बॅका व वित्तीय संस्थाकडून घेतलेले कर्ज अशा संकटात व्यापारी, उद्योजक सापडला आहे़े बॅकांचे हप्ते भरण्यासाठी ३ महिन्याची सवलत जरी दिलेली असली तरी मात्र थकीत तीन हप्त्याची रक्कम उद्योजकांना भरावीच लागणार आहे़ हा सर्व आर्थिक फटका भरून काढण्यासाठी व उद्योजक, व्यापाराला उभारी आणण्यासाठी शासनाकडून मदतीची अपेक्षा उद्योजकांकडून होत आहे़नागरिकांनी खबरदारी घ्यावीअडीच महिन्यापासून बंद असलेले उद्योग व व्यापार गेल्या जुन महिन्यापासून सुरू झाला आहे़ तो पूर्वपदावर आणण्यासाठी उद्योजकांची धडपड सुरु असताना. दुसरीकडे कोरोनाचे रुग्ण कमी होण्याऐवजी गतीने वाढत आहे. सध्यास्थितीत जिल्ह्यात १ हजार १४६ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत़ अन्य जिल्ह्याच्या तुलनेत ही संख्या कमी असली तरी नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे़अन्यथा पुन्हा लॉकडाऊनअनलॉकच्या कालावधीत जिल्हा प्रशासनाकडून सम-विषम तारखेनुसार व्यवसाय नियोजन करून देण्यात आले आहे़ मात्र नागरिक हे बाजारात विनाकारण गर्दी करतांना दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाबाधीतापासून संसर्ग होण्याची भीती अधिक आहे. ते टाळण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घरात बाहेर निघणे बंद केले पाहिजे. अन्यथा परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली तर शहरासह जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन घोषीत करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेतला जावू शकतो़तसे झालेतर पूर्वपदावर येत असलेल्या उद्योग, व्यापार तसेच लहान मोठ्या व्यवसायांवर परिणाम होऊ शकतो़ तसेच अनेकांचा रोजगार पुन्हा धोक्यात येवून जिल्ह्यास बेकारी वाढून गुन्हेगारी वाढू शकते़काय सुरू?हॉटेल खानावळीतून घरपोच सेवेला परवानगी, तीनचाकी व चारचाकी वाहनांकरीता एक अधिक दोन व्यक्ती व दुचाकी वाहनांकरीता एका व्यक्तीला सेवेकरीताच परवानगी, मॉल्स व व्यापारी संकुल व्यतिरिक्त जिवनावश्यक वस्तू आणि सेवांची सर्व दुकाने, सर्व सलून, स्पा सेंटर, ब्यूटी पार्लर, बार्बर दुकाने सुरू राहतीलकाय बंद?सर्व प्रकारचे हॉटेल, बार, सिनेमागृहे, मॉल, व्यापारी संकुल, क्रीडा संकुले, स्वीमिंग पूल, सभागृहे, व्यायामशाळा, धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे, शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संकुल, प्रशिक्षण केंद्र, खासगी शिकवण्या, रेस्टॉरंट बार, सामाजिक, राजकीय व इतर सेवा बंद राहतीलमहागाई वाढली का?भाजीपाला : अडीच महिन्याचा लॉकडाऊननंतर व्यवहार सुरळीत झाल्याने अनेकांनी अडीच महिन्याची भर काढण्यासाठी जीवनावश्यक वस्तूसह अन्य वस्तूचे भाव वाढवून दिले आहेत़ त्यात भाजीपाला, इलेक्ट्रॉनिक वस्तू, पेट्रॉल, डिझेल तसेच भाव वाढीची मागणी देखील केली जात आहे़किराणा : अनलॉकच्या पहिल्या मुगदाळ, तेल, खोबरे, सोयाबीन तसेच विविध खाद्य पदार्थाचे भाव वाढले आहे़ लॉकडाऊनच्या कालावधीत वाहतूक व्यवस्था बंद असल्याने अनेकांनी साठवलेला मालाची किमंती वाढविल्या आहेत़ त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कोरोना संकटाच्या काळात मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे़

टॅग्स :Dhuleधुळे