दुष्काळात तेरावा, महाविद्यालयांतच अडकले मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज
उस्मानाबाद : मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणास आर्थिक हातभार लागावा, यासाठी सामाजिक न्याय विभागाच्यावतीने मेट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. जिल्ह्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील
जिल्ह्यातील १२ हजार ८२० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. हे अर्ज संबंधित महाविद्यालयांनी पडताळणी करून देणे बंधनकारक आहे. मात्र, आजघडीला ७६९ अर्ज महाविद्यालय स्तरावर पडताळीविना पडून आहेत.
अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्ग प्रवर्ग घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी शासनाच्यावतीने मेट्रिकोत्तर शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली आहे. २०२०-२१ या वर्षातील शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास ३ डिसेंबर २०२० पासून प्रारंभ झाला होता. शिष्यवृत्तीसाठी जिल्ह्याभरातील १२ हजार ८२० विद्यार्थ्यांनी आजवर ऑनलाईन अर्ज केले आहेत. यापैकी एस.सी. प्रवर्गातील ६ हजार १४५ विद्यार्थ्यांचे अर्ज आहेत, तर ६ हजार ६७५ अर्ज व्हीजेएनटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी सादर केले. आलेले अर्ज महाविद्यालयांनी पडताळणी करून देणे बंधनकारक आहे. असे असतानाही सध्या महाविद्यालयांकडून अर्ज पडताळणी धिम्या गतीने सुरू आहे. ७६९ अर्ज पडताळणीविना पडून असून, ३१ जूनपर्यंत महाविद्यालयांना अर्जांची पडताळणी करावी लागणार आहे.
महाविद्यालयांशी पत्रव्यवहार
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर त्याची महाविद्यालय स्तरावरून पडताळणी केली जाते. काही विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्याने महाविद्यालय स्तरावर अर्ज प्रलंबित राहिले आहेत. ३० मार्चपासून सतत मुदतवाढ देण्यात आली आहे. महाविद्यालयांना पत्र पाठविण्यात आले आहे. ३० जूनपर्यंत महाविद्यालयांनी अर्जाची पडताळणी करून सहकार्य करावे.
बाबासाहेब अरवत, सहायक आयुक्त समाजकल्याण
ऑनलाईन अर्ज सादर केले
एस.सी प्रवर्ग व्ही.जे.एन.टी
६१४५ ६६७५
समाजकल्याण विभागाने निकाली काढले
एस.सी व्ही.जे.एन.टी
५८४० ६२११
महाविद्यालय स्तरावर प्रलंबित
एस.सी व्ही.जे.एन.टी
३०५ ४६४
अभिजित गायकवाड
बी. ए. पदवी अभ्यासक्रमास मी प्रवेश घेतला आहे. शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यात आला आहे. मात्र, आधार लिंक होत नसल्याने महाविद्यालय स्तरावर शिष्यवृत्तीचा अर्ज प्रलंबित आहे. आधार लिंक होत शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागणार आहे.
अभिजित गायकवाड, विद्यार्थी