उस्मानाबाद : शहरातील सांजा रोडवरील परशुराम वस्तीतील हनुमान, काळाराम मंदिरात श्रीराम मंदिर निधी संकलन अभियानांतर्गत प्रसन्नकुमार कोंडो यांचा गीत रामायण गायनाचा कार्यक्रम झाला.
यात निवेदक वैभव कुलकर्णी, तबला अण्णा वडगावकर, संवादिनी अशोक कुलकर्णी, टाळ शेषनाथ वाघ, कृपा कुलकर्णी, शरद वडगावकर यांनी साथसंगत केली. गीत रामायण कार्यक्रमासाठी सेवार्थ योगदानाबद्दल पं. दीपक लिंगे, राजेंद्र भंडारी यांचा शाल, गौरवपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मेधा चोराखळीकर यांचे अभीष्टचिंतन केले. कार्यक्रमासाठी गीतरामायणाचे कवी ग. दि. माडगूळकर यांच्या नात डॉ. सायली कुलकर्णी, नंदकुमार चोरखळीकर, अनंतराव आघोर, प्रदीप चिखलीकर, प्रल्हाद कुलकर्णी, राजेंद्र अत्रे, विजयश्री अत्रे, वैशाली चव्हाण, डॉ. महेश पौळ, संस्कार भारतीचे प्रभाकर चोराखळीकर, सुरेश वाघमारे, सुंभेकर, श्यामसुंदर भन्साळी, मुकुंद पाटील, मेंढेकर, अक्षय भन्साळी आदी उपस्थित होते.