परंडा : येथील रा. गे. शिंदे महाविद्यालयास ‘अ’ दर्जा मिळाल्याने श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संजय निंबाळकर यांचा तसेच महाविद्यालयातील नॅकसाठी कार्यरत असलेल्या सात क्रायटेरियाचे मुख्य समन्वयक आणि त्यांची टीम यांचा संस्थेच्या वतीने महाविद्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष सुनील शिंदे, प्राचार्या, डॉ. दीपा सावळे, आयक्यूएसीचे समन्वयक प्रा. दीपक तोडकरी, प्रा. विद्याधर नलवडे, डॉ. महेशकुमार माने, प्रा. डॉ. शहाजी चंदनशिवे आदी उपस्थित होते. महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रकाश सरवदे यांना महाविद्यालयातून प्रथमच पेटेंट मिळण्याचा मान प्राप्त झाल्यामुळे त्यांचा तसेच ‘बी होक’ या विभागाचे प्रा. सज्जन यादव, ग्रंथपाल प्रा. डॉ. राहुल देशमुख यांचाही सत्कार करण्यात आला.
संजय निंबाळकर यांचा परंड्यात सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:29 IST